
शिवाजी महाराज यांचे तैलचित्र सौंदर्यीकरण कामाचा शुभारंभ
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
शिरपूर जैन बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र लावलेल्या ठिकाणचे सौंदर्यीकरण कामाचा शुभारंभ प्रशासक सिंधुताई कांबळे यांच्या शुभहस्ते सोमवारी करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र चौधरी, सादीक सेठ बागवान, संजय जाधव, मा पं सं सदस्य गजानन इरतकर प्रशासक समितीचे सदस्य कलीम रेगीवाले,असलम परसुवाले,पप्पु देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.शिरपूर येथील बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावलेल्या ठिकाणाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. अशी मागणी गावातील शिवप्रेमीं कडुन करण्यात आली होती. ही मागणी ग्रामपंचायतच्या वतीन काही दिवसांपूर्वी मान्य करण्यात आली. त्यानुसार सोमवार २३ मार्च रोजी सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामावर जवळपास २ लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे.त्यामुळे परिसरातील सौंदर्यात याची निश्चितच भर पडणार आहे. यावेळी मुक्तारखा पठाण,बाबू गौरवे,गजानन भोसले,विलास कांबळे,बबन देशमुख,आतिष जाधव,अमर देशमुख,विलास देशमुख,अमोल देशमुख,गजानन देशमुख, शशिकांत देशमुख,संदीप देशमुख,वसंतराव देशमुख, बळीराम भालेराव,दीपक वाघ,राजेश देशमुख, महावीर बेलोकार,शंकर वाघ हे उपस्थित होते. ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात येणाऱ्या सौंदर्यीकरण कामाचा शुभारंभ झाल्याने शिवप्रेमी मध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
