मिरवणूक मार्गावर झाडावरील आग्यामोहळाचां धोका

मिरवणूक मार्गावर झाडावरील आग्यामोहळाचां धोका.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

शहरातील मेन रोड लगत असलेल्या पिंपळाच्या झाडाला अनेक आग्या मोहळाची पोळ समुदायाने असून येथून विविध मिरवणूका गावात जातात. त्यामुळे काही अनर्थ झाला व ह्या मधमाश्या हल्ला चढवू शकतात.मेन रोड वरील डाॅक्टर चव्हाण दवाखान्या समोर पिंपळाच्या झाडावर मोठ्या प्रमाणात आग्या मोहोळ मधमाश्याची जवळपास आठते दहा पोळे समुदायाने असून येथून जाणाऱ्या विविध मिरवणूका मधील वाजंत्री वा डिजे साऊंड सिस्टीम आवाजाने त्या खवळलेल्या तर त्यापासून धोका निर्माण होवू शकतो त्या मधमाश्यानी टोळक्याने हल्ला करणण्याची शक्यता आहे.
सध्याची आजूबाजूलाच्या त्या मधमाश्या दुकानात येत आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तरी लवकरात लवकर नगरपंचायत प्रशासनाने काही तरी उपाययोजना करून त्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे.
पुढील काही दिवसातच रामनवमी, महावीर जन्मकल्याणक, तसेच भिमजयंतीच्या मिरवणूका याच मार्गाने पूढे गावात जातात तरी याची वेळीच नगरप्रशासनाने काळजीपूर्वक दक्षता घेवून ही समस्या सोडवण्यासाठी हालचाल करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *