
सुनंगाव येथे गणगौर उत्सव मिरवणूक गणगौर उत्सवात राजस्थानी संस्कृतीची पारंपारिक झलक पाहायला मिळाली
जळगाव जामोद प्रतिनिधी
सुनगाव :-२२ मार्च रोजी सुनगावमध्ये गणगौर उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरण आनंदमय केले. खास जयपूर, बिकानेर आणि उदयपूर येथे गणगौर पूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हा उत्सव धुळिवंदन नंतर 16 दिवसांचा साजरा केला जातो. या 16 दिवसात विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात, जसे की पारंपारिक नृत्य, नाटिका आणि , गीत गायले जातात,त्याला मारवाडी मध्ये बिंदोरा असं म्हणतात.गुडिपाडवा नंतर तृतीयेला यांचं विसर्जन केल्या जात.सुनगाव मध्ये विशेष इसरजी आणि गवराजी वेशभूषा देखील करण्यात आली, ज्यामुळे या कार्यक्रमाला राजस्थानी स्पर्श मिळाला. त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. समाजातील सदस्य—पुष्पा झंवर, कांता झंवर, शारदा चांडक , विद्या राठी, किरण केला, कीर्ती राठी, पुष्पा पवार , हेमा झंवर, दर्शना केला, सुनीता झंवर, ज्योती झंवर, मीरा केला, निकिता पालीवाल आणि काजल राठी—यांनी कार्यक्रमाच्या आयोजनातील त्यांच्या योगदानाबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली. असा हा गणगौर एक धार्मिक श्रद्धेचा उत्सव आहे.
