स्वदहनाचा इशारा मागे माघार नाही तर लढा कायम प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्तक्षेपाने गणेश अहिर यांची चौकशीची नवी मागणी

स्वदहनाचा इशारा मागे माघार नाही,तर लढा कायम प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्तक्षेपाने गणेश अहिर यांची चौकशीची नवी मागणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

नगरपंचायत मधील ऑफलाईन टेंडर प्रकरणावरून २३ मार्च रोजी स्वदहनाचा इशारा देणारे नगरसेवक गणेश रामप्रसाद अहिर यांनी अखेर प्रतिष्ठित नागरिकांच्या मध्यस्थीनंतर आपला निर्णय स्थगित केला आहे. मात्र,“माघार नाही,तर लढा कायम” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना नवीन निवेदन सादर करत सखोल चौकशीची जोरदार मागणी केली आहे.
अहिर यांनी दिलेल्या निवेदनानुसार,१८ मार्च रोजी त्यांनी ऑफलाईन टेंडर प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेत कामांना स्थगिती न दिल्यास स्वदहनाचा इशारा दिला होता यानंतर २० मार्च रोजी नगरपंचायती कडून टेंडर प्रक्रिया नियमांनुसार झाल्याचे उत्तर देण्यात आले, मात्र हे उत्तर असमाधानकारक असल्याचे स्पष्ट करत अहिर यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह कायम ठेवले आहे. तर दुसरीकडे स्वदहनाचा इशारा प्रतिष्ठित नागरिकांच्या मध्यस्थीने ; तो निर्णय स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने सुटकेचा निःश्वास घेतला आहे.
दरम्यान,शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी हस्तक्षेप करत अहिर यांना समजावून सांगितल्यामुळे त्यांनी त्यांच्या मान व आदर राखत स्वदहनाचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे . यामुळे शहरात निर्माण झालेला तणाव काही प्रमाणात निवळला असला तरी प्रकरण अजूनही तापलेलेच आहे.
चौकशीची मागणी अधिक तीव्र
नवीन निवेदनात अहिर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यां कडे खालील महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत ऑफलाईन टेंडरची निविदा सूचना फलकावर लावली होती का? याची चौकशी टेंडर प्रक्रिया नियमाप्रमाणे उघडण्यात आली का ? याची खात्री काय ?
सुरू असलेल्या कामांमध्ये वापरलेल्या साहित्याची क्वालिटी कंट्रोलमार्फत तपासणी वापरलेल्या गौण खनिजांवर शासनाची रॉयल्टी भरली आहे का? याची पडताळणी करण्यात आली पाहिजे.या सर्व प्रकरणाची १५ दिवसांत सखोल चौकशी इतकेच नव्हे,तर चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कामाचे बिल अदा करू नये,अशी ठोस मागणीही त्यांनी केली आहे.
यामुळे नगर प्रशासनावर दबाव वाढला या निवेदनाची प्रत त्यांनी जिह्याचे पालकमंत्री,आमदार,
पोलीस प्रशासन यांनाही पाठविण्यात आली असून आता जिल्हाधिकारी स्तरावर कोणती कारवाई होते,याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.चौकट १“उत्तर मिळाले,पण समाधान नाही!” — अहिर ठाम
नगरपंचायतीने दिलेले उत्तर स्वीकारण्यास नकार देत “हे उत्तर समाधानकारक नाही” असे स्पष्ट सांगत गणेश अहिर यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे आता हा मुद्दा केवळ आंदोलना पुरता मर्यादित न राहता चौकशी व कारवाईच्या टप्प्यावर पोहोचला आहे.चौकट २ स्वदहन थांबले…पण वाद पेटलाच!
स्वदहनाचा इशारा जरी स्थगित झाला असला तरी ऑफलाईन टेंडर प्रकरणातील आरोप गंभीरच असून शहरातील राजकीय व प्रशासकीय वातावरण तापलेलेच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *