भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; प्रशासन झोपेतच? वार्ड क्र. ८ मध्ये चिमुकल्यावर हल्ला.

भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; प्रशासन झोपेतच? वार्ड क्र. ८ मध्ये चिमुकल्यावर हल्ला.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून प्रशासन मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर येत आहे. वार्ड क्रमांक ८ मध्ये साहिल संतोष ताजने या निष्पाप बालकावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत लहान मुले, महिला व पुरुष यांच्यावर भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. तरीही नगरपंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “आता नागरिकांनीच आपली सुरक्षा स्वतः करायची का?” असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कुत्र्यांच्या निर्बंधासाठी कोणतीही प्रभावी मोहीम राबवली जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. जीव धोक्यात घालून नागरिकांनीच रस्त्यावर फिरायचे आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घ्यायची का, असा रोष व्यक्त होत आहे.जर तात्काळ उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला नाही, तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.चौकट :नागरिक त्रस्त; प्रशासन सुस्त मालेगाव शहरात नागरिकांत भीतीचे सावट असताना नगरपंचायत प्रशासन कधी जागे होणार? या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार हा प्रश्न आता सर्वांच्या मनात घर करून बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *