
कोरपणा नगरपंचायत सफाई कामगारांचे शोषणथांबवा – कंत्राटदारावर कारवाई करा
आबिद अली (ता प्र ) कोरपणा नगरपंचायत च्या 17 प्रभागांमध्ये कंत्राटी सफाई कामगार गेल्या अनेक वर्षापासून सफाई कामगार म्हणून आपलं आरोग्य धोक्यात टाकून शौचालय घनकचरा त्याचबरोबर मृत्यू पावलेली जनावरे कुत्रे मांजर ओढण्याचे कार्य अविरत सफाई कामगार करीत आहे अनुसूचित जाती जमातीच्या कामगारांचे सर्रास शोषण होत असून कोरफना नगरपंचायत मध्ये लाड पागे समितीचा अहवाल बसताना बांधून त्यांच्या हक्काचा श्रम मोबदला नियमाप्रमाणे अदा केल्या जात नाही कंत्रालदार गेल्या अनेक वर्षापासून सुरक्षा कीट पुरवलेले नाही कोरपणा नगरपंचायतचे 2016 पासून तब्बल दहा वर्षात कंत्राटदार कोण आहे याचा थागंपत्ता कामगारांना माहित नाही सफाई कामगारांना सफाई कामगार म्हणून ओळखपत्र देखील कामगारांना देण्यात आलेले नाही नगरपंचायतचे पदाधिकारी मंजूर पगार पत्रकानुसार पगार अदा न केल्या जात असल्याने 24 हजाराची मंजुरी असताना फक्त दहा हजार पाचशे रुपये त्या कामगारांच्या माथीमारला जात आहे दर महिन्यासाठी होणाऱ्या पगारामध्ये वर्षभरात लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्या जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे सफाई कामगार म्हणून नेहमी भविष्य निर्वाह निधी पीएफ कपात केल्या जाते मात्र यांच्या खात्यावर ती रक्कम नसल्याने लाखो रुपयांचा पीएफ घोटाळा झाला आहे नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक शंकर तांड्रा हे गैर विभागात सहभागी असल्याचा आरोप देखील कामगारांनी केला आहे कामगारांना बँक खात्यावरून पैसे जमा करून उचल करण्याचा अधिकार नाही सदर रक्कम एका खाजगी बँकेत खाते खोलून ती रक्कम उचल केल्या जात आहे या कामगारांनी कधीच बँकेत जाऊन पैसे उचल केले नसल्याचे सांगत बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे सदर कामगार हे आपल्या हक्काची भाषा बोलल्यास त्यांना शिवीगाळाचा प्रसाद मिळत असल्याने व नगरपंचायतीचे कामाऐवजी नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या घरगुती शेती जिनिंगच्या कामा करावे लागते असे आवर्जून चरणदास पंधरे सुधाकर आत्राम दिगंबर सोळंके आनंदराव आपटे व इतर कामगारांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे गेल्या दहा वर्षात स्वच्छ भारत अभियान घन व घनकचरा व्यवस्थापनामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असताना नगरपंचायतीच्या चार वाहना पैकी दोनच वाहनाने वाहतूक धनकचऱ्याची केल्या जात आहे या सर्व प्रकारावर नगर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे धनकचरा व्यवस्थापन व कंत्रदाराच्या संपूर्ण कारभाराचा व निधीच्या गैरप्रकार कामगारांचे सातत्याने झालेले शोषण याची गंभीर दखल घेऊन सफाई कामगार व कचऱ्याच्या नावावर कामगारांचे शोषण करणाऱ्या झारीतील शुक्राचार्य चा शोध घेऊन कामगारांना न्याय द्यावा दोषी कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा कामगारांना तक्रारीची चौकशी होत पर्यंत कामावरून काढण्याची धमकी देण्यात येऊ नये व याची दखल नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली यांनी नगर विकास प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली असून या प्रकरणाचा सखोल चौकशी करून कामगाराला न्याय द्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
