जांभरुणवाडी कृषी पंप चा विद्दुत पुरवठा तत्काळ सुरू करण्या बाबत म . वि. वि.कंपनी चे अभियंता श्री मिरगे साहेब मालेगाव ह्यांच्याकडे शेतकऱ्याची मागणी.

जांभरुणवाडी कृषी पंप चा विद्दुत पुरवठा तत्काळ सुरू करण्या बाबत म . वि. वि.कंपनी चे अभियंता श्री मिरगे साहेब मालेगाव ह्यांच्याकडे शेतकऱ्याची मागणी.

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

मौजे जांभरूण वाडी येथील शकुंतलाबाई श्रीराम घोडे ह्यांचे शेतामध्ये असलेल्या डी. पी.वरुण ज्या कृषी पंप ला विद्युत पुरवठा होत असायचा ती एल. टी. लाइन काही दिवसापूर्वी चोरी झाली असल्याने संबंधित शेतकऱ्याचा विद्युत पुरवठा मागील बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. संबंधित एल टी.लाइन चोरी झाली तेंव्हा कंपनीच्या कार्यालयात व संबंधित लाईनमन इंगळे ह्यांना कळविले होते तरीही विद्युत पुरवठा सुरू न करण्यात आल्यामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले आहे खरिपात पावसाने . दडी मारली असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे शक्य झाले नाही.. निदान रब्बी हंगामात तरी नुकसान होऊ नये म्हणून पुन्हा दिनांक 21/9/26 रोजी शेतकऱ्यांनी म रा. वि वि. कंपनी मर्या मालेगाव चे अभियंता श्री मिरगे साहेब ह्यांना संबंधित कृषी पंपाची एल. टी. लाइन जोडणी करून विद्युत पुरवठा तत्काळ सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे. . निवेदनावर रामदास वानखेडे. श्रीकृष्ण नांदे. पांडुरंग कांबळे.ह्यांचे सह इतर शेतकऱ्याच्या सह्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *