मशाल पेटली, प्रशासन हलले! मध्यरात्री दादुलगाव ग्रामपंचायतीला सील”

मशाल पेटली, प्रशासन हलले! मध्यरात्री दादुलगाव ग्रामपंचायतीला सील”

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी

जळगाव जा :-स्वतंत्र भारतात न्याय मिळत नसल्याने २१ सप्टेंबरच्या संध्याकाळी दादुलगाव येथील तरूण संकेत गई व ग्रामस्थांनी संवैधानिक मार्गाने जळगाव जामोद ते बुलढाणा पाई मशाल मोर्चाला सुरुवात करताच, जळगाव जामोद पंचायत समिती प्रशासनाचे धाबे दणाणले.अखेर कायदा व सुव्यवस्था राखत जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सचीन बागूल यांच्या मध्यस्थीने पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी रात्री 12 वाजेच्या दरम्यान दादुलगाव ग्रामस्थांच्या समोर पोलीस संरक्षणात ग्रामपंचायतला सील करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दादुलगाव जुने येथील संकेत गई या तरुणाने दादुलगाव ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामाचा संदर्भात माहिती अधिकारात अनेकदा माहिती मागितली परंतु ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समिती प्रशासनाने त्यांना वेळेत माहिती उपलब्ध करून दिली नाही. आश्वासनाच्या पलीकडे त्यांच्या पदरात काहीही पडले नाही. अखेर 21 सप्टेंबर च्या संध्याकाळी मिनमिनत्या अंधारात संविधानिक मार्गाने संकेत गई या तरुणांने हातात पेटती मशाल घेवून ग्रामस्थांच्या सोबतीने जळगाव जामोद ते बुलढाणा पाई आंदोलनाला सुरुवात केली. भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद या घोषणा देत‌ रात्रीच्या अंधारात हातात क्रांतीची पेटलेली धगधगती मशाल हातात घेऊन आंदोलन करते एक एक पाऊल पुढे टाकत जात होते. दरम्यान पोलीस प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी त्यांच्यासोबतच होते. जेमतेम सात ते आठ किलोमीटरचे अंतर कापून आंदोलक खांडवी येथे पोहोचतात. जळगाव जामोद चे कर्तव्यदक्ष ठाणेदार सचिन बागुल यांनी संकेत गई व ग्रामस्थांची संवाद साधला. त्यांच्या मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. गटविकास अधिकारी कोरे मॅडम व आंदोलक संकेत गई यांचे फोनवर बोलणे करून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या कायदेशीर मार्गाने कशा पूर्ण करता येईल याबाबत चर्चा केली. व चर्चेअंती तात्काळ दादुलगाव कार्यालयाला सील केले जाईल अशी ग्वाही बिडिओ मॅडमनी दिली. त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी काही काळ आपले आंदोलन थांबवून थेट दादुलगाव ग्रामपंचायत कार्यालयावर आपला मोर्चा वळवला. रात्रीचे अकरा वाजून गेले तरीही पंचायत समिती प्रशासनाकडून याबाबत कुठलीच कार्यवाही करण्यात येत नव्हती. त्यामुळे आंदोलकांनी पुन्हा आपले आंदोलन सुरू करत हातात पेटती मशाल घेऊन दादुलगाव ग्रामपंचायत ते बुलढाणा पाई प्रवास सुरू केला. रात्रीच्या गडद अंधारात जीवाची पर्वा न करता आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे या भावनेने प्रेरित झालेल्या या तरूणांनी पुन्हा इन्कलाब जिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद घोषणा द्यायला सुरुवात केली. आंदोलन करते मानेगाव जवळ पोहोचतात पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना थांबवण्यात आले. पुन्हा जळगाव जामोद चे ठाणेदार सचिन बागुल सरांनी गटविकास अधिकारी कोरे मॅडम यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले.सध्या सार्वत्रिक गणेशोत्सव सुरू असून तालुक्यात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून त्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे. याची जाणीव गटविकास अधिकारी मॅडमना करून दिली. अखेर गटविकास अधिकारी कोरे मॅडम यांनी आपल्या पंचायत समिती विभागातील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवून तात्काळ आम्ही ग्रामपंचायतला सिल करून घेतो असे सांगितले. त्यामुळे ठाणेदार सचिन बागुल यांनी आंदोलन करणाऱ्या युवकांना आपण आंदोलन थांबवावे .आपल्या मागण्या संदर्भात बिडिवो मॅडम सकारात्मक असल्याचे सांगितले.अखेर 21 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेच्या दरम्यान संकेत गई व ग्रामस्थांच्या समक्ष दादुलगाव ग्रामपंचायतला सिल करण्यात आले. यावेळी गौलखेडचे पोलीस पाटील विजय घाईट, दादुलगाव ग्रामपंचायतचे शिपाई भागवत झालटे,दादुलगावचे ग्रामस्थ,व जळगाव जामोद चे ठाणेदार सचिन बागुल सर ,पीएसआय अमोल पंडित, खाडे साहेब व पोलिस कर्मचारी हजर होते. ठाणेदार सचिन बागुल यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला .रात्रीची वेळ होती. सगळीकडे गणेशोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचला होता. तालुक्यात कुठेच शांततेचा भंग होणार नाही.कुठलाच अनुचित प्रकार घडायला नको यासाठी जळगाव जामोद चे ठाणेदार सचिन बागुल सर आणि त्यांची सर्व टीम प्रयत्नशील होती.आणि मग अशा परिस्थितीत वारंवार लेखी निवेदने देऊनही न्याय मिळत नसलेला दादुलगावचा संकेत गई हा तरुण हातात पेटती मशाल घेऊन जळगाव जामोद ते बुलढाणा पाई आंदोलनाला सुरुवात करतो.सोबत मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ त्यांच्या सोबतीला. पंचायत समिती कार्यालयाकडून त्याच्या कुठल्याच मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतलेला हा तरुण रात्रीच्या अंधारात वाट चालत राहतो.अशा वेळी आंदोलन करणाऱ्या युवकांना संरक्षण देत, त्यांच्या मागण्या संदर्भात बिडिओ मॅडम सोबत चर्चा करून,त्या आंदोलकांना कशा पद्धतीने न्याय देता येईल आणि त्यांचे आंदोलन थांबवता येईल यासाठी जळगाव जामोद चे ठाणेदार सचिन बागुल सर यांनी जो मुत्सद्दीपणा दाखवला खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.आंदोलन करणारे युवक पेटून उठले होते.पुढे काय घडणार यांची त्यांना पर्वा नव्हती.त्या रात्री काहीही घडले असते.जीवाची पर्वा न करणाऱ्या तरूणांच्या डोळ्यात क्रांतीच्या ज्योती पेटलेल्या होत्या.अशा संवेदनशील परिस्थिती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन बागुल यांनी परिस्थिती समजून घेत,कायदा व सुव्यवस्था उत्तम प्रकारे हाताळत आंदोलन करणाऱ्या युवकांना विश्वासात घेत, त्यांच्या मागण्या संदर्भात त्यांना दिलासा देण्याचे कार्य केले. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या युवकांना आपले आंदोलन थांबवावे लागले. ठाणेदार सचिन बागुल सर आणि आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा कर्तव्य तत्परतेमुळेच आंदोलनाला थांबवण्यात आले व पुढील अनर्थ टळला.ठाणेदार सचीन बागूल साहेबांसारख्या अधीकाऱ्यांची समाजाला गरज असून, जोपर्यंत असे प्रामाणिक आणि आपल्या पदाला न्याय देणारे अधिकारी समाजात आहेत तोपर्यंत न्यायदेवतेवर लोकांचा विश्वास अबाधित राहिल आणि काटेकोरपणे कायदा व सुव्यवस्थेचे पालन केला जाईल संविधानिक मार्गाने आमचा लढा सुरूच राहील. संकेत गई.” आज रोजी जरी दादुलगाव ग्रामपंचायतला सील करण्यात आले.तरी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही.आम्ही माहिती अधिकारात मागितलेली माहिती पुर्णपणे भेटत नाही तोपर्यंत आमचा हा लढा संविधानिक मार्गाने आम्ही असाच लढत राहू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *