सुनील दैवे यांच्या मारेकऱ्यांना पकडून कठोर शिक्षा करा श्री राठोड तेली समाज बांधवांची निवेदनाद्वारे मागणी

सुनील दैवे यांच्या मारेकऱ्यांना पकडून कठोर शिक्षा करा श्री राठोड तेली समाज बांधवांची निवेदनाद्वारे मागणी

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

बोदवड जि.जळगाव येथील सुनील दैवे यांच्या मृत्यूला जबाबदार असणारे देविदास प्रभाकर गंगतीरे व त्याचे सहकारी असलेले मारेकऱ्यांना पकडून कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी आज २३ मार्च रोजी श्री राठोड तेली समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, बोदवड येथे ११ मार्च रोजी स्व. सुनील शामराव दैवे यांना देविदास प्रभाकर गंगतीरे व त्यांचे सहकाऱ्यांनी मारहाण केली. मारहाणीत त्यांच्या मेंदुलामार लागल्याने उपचारा दरम्यान १९ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पो.स्टे.ला अप.क्र.३९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.स्व. सुनील दैवे यांना २ लहान मुली, म्हातारी आई व पत्नी आहे. घरातला कमावता व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तेव्हा या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच कठोर शासन करावे. जेणे करून त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी श्री राठोड तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *