खा. अनुप धोत्रे यांची थेट अमानी सह तालुक्यातील बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी शेतकरी चिंता करू नका सरकार तुमच्या पाठीशी

खा. अनुप धोत्रे यांची थेट अमानी सह तालुक्यातील बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी शेतकरी चिंता करू नका, सरकार तुमच्या पाठीशी

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,२३:-वाशिम जिल्ह्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांच्या बांधावर थेट जाऊन खासदार मा. अनुपभाऊ धोत्रे यांनी आज मालेगाव तालुक्यातील पिकांची पाहणी केली.
अमानी, जऊळका रेल्वे, उमरदरी.मैराळडोह,एरंडा सह किन्हीराजा परिसरातील सोयाबीन, तूर पिके पावसाअभावी वाळून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार साहेबांनी स्वतः शेतात उतरून सोयाबीनचे झाड हातात घेऊन पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी सांगितले की, “शेतकरी चिंता करू नका, केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे. मी स्वतः कृषिमंत्र्यांकडे आणि लोकसभेत तुमचा विषय मांडून कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी मदत आणि कर्जमाफी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.अमानी येथे
या दौऱ्यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, वर्ग आणि भाजप,शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू पाहून हळहळले खासदार धञे
दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेले अकोला-रिसोडचे खासदार मा. अनूप धोत्रे यांनी अमानी येथील शेतकरी गजानन तायडे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली.वाळून गेलेले सोयाबीनचे पीक दाखवतांना शेतकऱ्यांनी शेतातील फार मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केल्या वर्षभराची मेहनत वाया गेल्याची व्यथा ते खासदारांना सांगत असताना त्यांच्या काही शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रृ वाहूलागले . हे पाहून खासदार अनूप धोत्रे हे देखील भावूक झाले.
यावेळी खासदारांनी शेतकऱ्यांना धीर दिला व ग्वाही दिली की,”काळजी करू नका, शासन प्रशासन आपल्या सोबत आहे, आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही. तुमच्या नुकसानीची लवरच भरपाई देण्यासाठि मी प्रयत्न करणार असून तुमच्या व्यथा,दु :ख ,स्वतः सरकारपर्यंत पोहोचवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *