आरोग्याला ‘बुस्टर डोस’ सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासह ३९ उपकेंद्रांना तत्वतः मान्यता

आरोग्याला ‘बुस्टर डोस’ सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासह ३९ उपकेंद्रांना तत्वतः मान्यता आमदार_भावनाताई_गवळी यांच्या प्रयत्नाला यश

वाशिम जिल्हा प्रतिनिधी( अनिल जाधव)

निती आयोगाच्या मागास जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या वाशिम जिल्ह्याचा आरोग्यविषयक वनवास संपण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३९ उपकेंद्रे तातडीने कार्यान्वित करण्याची आग्रही मागणी आमदार भावनाताई गवळी पाटील यांनी केली असून, या प्रस्तावाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.जिल्ह्यातील प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्रे: *मुंगळा* (मालेगाव), *वाकद* (रिसोड), *गिरोली* व *इंझोरी* (मानोरा), *मानोली* (मंगरुळपीर) आणि *वारा जहांगीर (* वाशिम) *उपकेंद्रे* : कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम तालुक्यातील एकूण ३९ गावांचा यामध्ये समावेश आहे.या नवीन केंद्रांच्या निर्मितीमुळे केवळ आरोग्य सुविधाच सुधारणार नाहीत, तर जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रातील पदवीधरांसाठी रोजगाराची मोठी कवाडं उघडणार आहेत. बीएएमएस/एमबीबीएस , नर्सिंग, फार्मासिस्ट, डीएमएलटी , आणि एमपीडब्ल्यू यांसारख्या व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या शेकडो तरुण-तरुणींना स्थानिक पातळीवर शासकीय सेवेची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यासोबतच सुशिक्षित बेरोजगारांना मोठा आधार मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *