अकोला वाशिम जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक कार्यक्रम २९ मार्चला मतदान

अकोला वाशिम जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक कार्यक्रम ; २९ मार्चला मतदान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी( अनिल जाधव )

दि,२५ :-राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदाची निवडणुकीचा कार्यक्रम २० फेब्रुवारीला जाहीर झाला असून त्यानुसार २३ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला असून येणाऱ्या २७ फेब्रुवारी ला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे,तर २ मार्च अर्ज छाननी ची तारीख असून १८ मार्च ही दुपारी तीन वाजेपर्यंतअर्ज मागे घेण्याची तारीख आहे, आणि 20 मार्च रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे तर २९ मार्च रोजी मतदान आणि ३० मार्च रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली असून , आज दिनांक २५ फेब्रुवारीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला -वाशिम यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातील सर्व मतदार नेते पदाधिकारी व मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यावेळी माजी संचालक प्रकाश पाटील कुटे, तसेच गोपाल पाटील राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही अतिशय ताकतीने व जिद्दीने लढण्याचा निर्धार सर्व उपस्थित त्यांनी एकमताने व्यक्त केला याप्रसंगी सर्वांची उत्कृष्ट व एकजूट दाखवण्याची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली होती, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेची माजी संचालक दिलीप जाधव यांची सुपुत्र नितीन दिलीप जाधव व सुरेश शिंदे यांनी देखील अर्ज दाखल केल्याची चर्चा मालेगाव तालुक्यात आहे.
बॉक्स
संचालक पदाची निवडणूक
प्रवर्गनिहाय मतदारसंघात अनुसूचित जाती, जमाती १, इतर मागासवर्गीय १, भटक्या जाती विमुक्त जमाती व विशेष मागासवर्ग १, तसेच महिला प्रतिनिधी संघात २, आणि कृषी पवन ,शेतमाल प्रक्रिया संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती व जिल्हा सहकारी बोर्ड मतदारसंघात १, औद्योगिक मजुरांच्या, विणकारांच्या संस्था मतदारसंघात १, आणि पगारदार नोकरदारांच्या पतसंस्था, नागरी सहकारी बँका ग्रामीण व नागरी सहकारी पतसंस्था ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि इतर सभासद मतदारसंघातील एका संचालक पदासाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *