
अमानी येथे संत मुंगसाजी महाराज संस्थान व प्रसाद वाटप
मालेगाव जिल्हा प्रतिनिधी( अनिल जाधव )
मालेगाव तालुक्यातील अमानी येथील संत मुंगसाजी महाराज संस्थान जवळ आज संत मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचा वाटप करण्यात आला असून, दर्शनासह महाप्रसादाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला, अमानी येथे संत मुंगसाजी महाराज यांचे भव्य मंदिर गावकऱ्यांच्या वतीने लोकवणीतून बांधण्यात आलेले असून, येथे दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम होत असून पुण्यतिथीनिमित्त धामणगाव देव येथे पालखी दिंडी सोहळा चे आयोजन करण्यात येत असते तसेच सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने व गावकऱ्यांच्या सहकार्याने दिंडी तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते, तसेच भागवत सप्ताह देखील येथे करण्यात येत असतो या सर्व कार्यक्रमाला गावकऱ्यांचे सहकार्य लाभलेले असते,
