
ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे रोज,२०० ते ३०० रूग्णाची OPD होतेतालुक्यातील आजारी असलेल्या गरीब रुग्णांनी लाभ घेतला पाहिजे डॉ सुहान वाहुळे
प्रतिनिधी मालेगाव अनिल जाधव
मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दररोज दोन्ही टाईम जवळपास 200 ते 300 ओपीडी होते तसेच तालुक्यातील गोरगरिब , रुग्णालयात आलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांना शासनाच्या आरोग्य विभागाकडून वतीने मोफत तपासणी केली जाते व त्यांना औषध उपचार देण्यात येत असते, आजार असलेल्या रुग्णांनी लाभ घेतला पाहिजे असे मत मालेगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहास वाहुळे यांनी सांगितले, दर मंगळवार ला अकोल्यावरून डोळ्याचे डॉक्टर येऊन तपासणी करत असतात तर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी मानसिक आरोग्य तपासणी होत असते, सर्व स्तरावरील शासनाच्या योजना असतात त्याचा लाभ मात्र लाभार्थ्यांनी घेतलाच पाहिजे अशीही या प्रसंगी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी सुहास वाहुळे दिनांक आज ५ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात रुग्णांना तपासणी वेळी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
