
वार्षिक सप्तरंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..
प्रतिनिधी जळगाव जामोद
स्थानिक जळगाव जामोद नगर परिषद अधिनस्त असलेल्या श्री प्रगटेश्वर नगर परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक २ जळगाव जामोद शाळेचा वार्षिक सप्तरंग सांस्कृतिक कार्यक्रम आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ बुधवारला रोजी श्री संत रूपलाल महाराज नगर परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १.जळगाव जामोद च्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात नगर परिषद जळगाव जामोदच्या शिक्षण सभापती सौ लताताई कृष्णराव तायडे, नगरसेविका वैशाली तायडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सोनाली बैरागी, प्रशासन अधिकारी वहिद खान, डॉक्टर नंदूभाऊ तायडे यांचे शुभहस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले च्या प्रतिमापूजन, दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी नगर परिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष गणेशराव दांडगे, उपाध्यक्ष कैलास पाटील, नगरसेवक सैय्यद नफीस, सिद्धार्थ हेलोडे,परमानंद राजपूत, सचिन जोशी, भालेराव सर, सातव सर यांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमा दरम्यान शाळेची रंगरंगोटी करण्यासाठी शाळेला सामाजिक उत्तरदायित्व निधी उपलब्ध करून देणारे विक्रम टी समूहाचे भावेशजी पटेल सत्कारमूर्ती भाईश्री ग्रुप-विक्रम टी प्रोसेसर कंपनी जालना बुलढाणा/अकोला चे प्रतिनिधी जिल्हा विक्री अधिकारी शेख शाहरूख, शेख अलीम आणि जळगाव जामोद चे डिस्ट्रिबूटर संजय पलन यांचा सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. तद्वतच शाळेची रंगरंगोटी करून देणारे शाळेचे माजी विद्यार्थी पेंटर महेंद्र नितवणे यांचा शाळा आणि कंपनीच्या वतीने शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या सप्तरंग सांस्कृतिक कार्यक्रमात एकूण 75 इव्हेंट विद्यार्थ्यांच्या द्वारे सादर करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, देशभक्तीपरगीते,भीमगीते,नृत्य,नाटिका, व्यक्तीविशेष ,स्वगत आणि वेशभूषा, स्वच्छता विषय संदेश देणारे कृतीगीते,शालेय पोषण आहार गीते, कॉमेडीनृत्ये, गीतगायन, लेझीमनृत्य इत्यादी कार्यक्रम सादर केलेत.
या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात निमंत्रित,पालक, विद्यार्थी,उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार असोलकर,राहुल धनगर सर यांनी तर इव्हेंट मॅनेजमेंट अमर भगत सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक शिवहरी रोजतकार सर, डॉ.महादेव सातव,अनिल ढगे, शिक्षक सुजाता देशमुख, रंजना मापारी,सविता बनकर,ज्योती डोंगे,गोपाल पाऊलझगडे, गणेश गायकवाड,योगिता मोरे , कु.भारती पोतदार यांनी परिश्रम घेतले..
