
श्रीसंत अवलिया महाराजांच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक लाखांवर भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ : ६५१ भाविकांनी शेंडीने गाढे ओढून फेडला नवस
मालेगाव प्रतिनिधी (अनिल जाधव)
मालेगाव तालुक्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व नवसाचा देव म्हणून राज्यात प्रसिध्द असलेल्या श्री क्षेत्र काळामाथा येथील श्री संत अवलिया महाराज यांच्या १३८ व्या यात्रा महत्सवानिमित्त १ फेब्रुवारी रोजी भक्तांचा महासागर उसळला होता. यावेळी श्री संत योगी अवलिया महाराजांच्या चरणी एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी नतमस्तक होत महाप्रसादाचा लाभ घेतला.नवसाचा देव श्री संत योगी अवलिया महाराज यांचा यात्रा महोत्सव श्रीक्षेत्र काळामाथा (उमरदरी) येथील श्रीसंत अवलिया महाराज संस्थान च्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अवलिया महाराज हे नवसाला पावणारा देव असल्यामुळे अनेक भाविक मनोकामना पूर्ण होण्याकरिता व मनोवांचित फलप्राप्ती करिता श्री अवलिया महाराजाला नवस बोलतात व मनोवांचित फलप्राप्ती झाल्यानंतर महाराजांना बोललेला नवस फेडण्यासाठी भाविक दूर-दूरवरुन व काळामाथा येथे येतात व आपला नवस माघ शुध्द पौर्णिमेला आयोजित करण्यात येत असलेल्या भव्य महाप्रसाद वितरणाच्या दिवशी फेडतात. या दिवशी श्री अवलिया महाराजांचे भक्त महाराजांना पुरण पोळीचा नैवैद्य दाखवून व शेडींने गाढे ओढून आपला नवस पूर्ण करतात. याही वर्षी हजारो भाविक दोन ते तिन दिवस अगोदरच काळामाथा येथे मोठ्या संख्येने दाखल झाले होते. १ फेब्रुवारी माघ शु.पौर्णिमैच्या दिवशी ६५१ भाविकांनी नवसाच्या देवाला पुरण पोळीचा नैवैद्य दाखवून व शेंडीने गाढे ओढून आपला नवस फेडला. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ४ वाजता संस्थानचे अध्यक्ष रामेश्वर गोंडाळ, उपाध्यक्ष उत्तमसिंग राठोड व विश्वस्त मंडळाच्या शुभस्ते श्रींची महापुजा व अभिषेक करुन सकाळी ९ वाजता महंत शांतीपुरी महाराज (येवती) महंत अमर गिरी महाराज यांच्याहस्ते महाप्रदाचे पुजन करुन महाप्रसाद वितरणाला प्रारंभ केला. १११ क्विंटलच्या पुरीभाजी व बुंदीच्या महाप्रसादाचे रांगेत वितरण करण्यात आले. यावेळी अवलिया महाराजांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाखापेक्षा अधिक भाविकांनी भक्तांनी लाभ घेतला. श्री अवलिया महाराज संस्थान प्रशासनाकडून दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येणाºया सर्व भाविकांच्या आरोग्यासाठी मोफत अरोग्यसेवा, मंदिर व परिसरातील साफसफाई, स्वच्छता ,पिण्याचे शुध्द पाणी व भाविकांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महाप्रसाद वितरणाची जबाबदारी शिवशंकर महिला भजनी मंडळ, रावसाहेब गणेश मंडळ किन्हिराजासह गिव्हा, उमरदरी, गणेशपूर, उमरदरी, वरदरी बु.,मैराळडोह, एरंडा, जऊळका, दुबळवेल येथील भाविक भक्तांनी पार पाडली.
