
शिरपूर येथील चतुर्मुख मंदिराचा वार्षकोत्सव उत्साहात
मालेगाव प्रतिनिधी (अनिल जाधव)
जगप्रसिद्ध असलेल्या श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ महातीर्थ येथील नुतन चर्तुमुख जैन मंदिराचा तृतीय वार्षिकोत्सव भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ध्वजारोहणा लाभ घेणाºया लाभार्थी परिवाराच्याहस्ते मंदिराच्या शिखरावर धार्मिक विधीसह मंत्रोच्चारात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आचार्यश्री विमलहंस सुरिश्वर महाराज यांच्यासह अन्य साधु मुनीराज व साधविवृंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी शेकडोच्या संख्येने श्वेतांबर जैन समाज बांधव उपस्थित होते.जैनांची काशी असलेल्या श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थान शिरपूर जैन येथील कांतीलाल लल्लुभाई झेविरी संकुल पारसबाग येथे सुंदर व आकर्षक नूतन चर्तुमुख जैन मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. या मंदिरात श्री ऋषभदेव भगवान, श्री संभवनाथ भगवान, श्री विमलनाथ भगवान व श्री महावीर स्वामी या तीर्थकारांच्या मुर्तींची सन २०२३ साली प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. सुरत येथील विधीकारांनी सतरभेदी पूजा व अभिषेक पूजन केल्यानंतर मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आचार्यश्री विमलहंस सुरिश्वर महाराज, मुनीराज राजहंस विजय मुनीराज रत्नवल्लभ विजय महाराज आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात श्री अंतरिक्षी पार्श्वनाथ संस्थानचे मॅनेजिंग ट्रस्टी दिलीप शाह, उपाध्यक्ष डॉ.संतोष संचेती, विश्वस्त अभय शाह, मुकेश कोरडीया,पारसमल गोलेच्छा, किशोर सोनी, प्रकाशचंद सोनी, वैभव शाह, मनीष संचेती, हसमुख शाह यांच्यासह इतर विश्वस्त मंडळींची उपस्थिती होती. मुंबई, नागपूर, अकोला, सुरत, बारडोली,अहमदाबाद,वाशीम, मालेगाव, लोणार, जालना, हिंगोली,परभणी, संभाजीनगर आदी विविध ठिकाणावरून शेकडोच्या संख्येने श्वेतांबर जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
