
वसारी येथे मॅराथॉन स्पर्धा उत्साहात
प्रतिनिधी मालेगाव (अनिल जाधव)
मालेगाव येथून जवळच असलेल्या वसारी येथील छज्ञवा प्रतिष्ठानच्यावतीने १ फेब्रुवारी रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत प्रथम बक्षीस ११ हजार रुपये आ. अमित झनक यांच्याकडून, दुसरे बक्षीस ७ हजार रुपये शासकीय कंत्रटदार विजय जाधव यांच्याकडून, तिसरे बक्षीस ५ हजार रुपये सुधीर लादे यांच्याकडून, चौथे बक्षीस २५०० रुपये ऋषिकेश जाधव यांच्याकडून तर पाचवे बक्षीस १ हजार रुपये छावा प्रतिष्ठानकडून देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रामधून या स्पर्धेत एकूण ४५ स्पर्धक सहभागी झाले होते. माजी सभापती मधुकर काळे, वसारी येथील सरपंच लक्ष्मण जाधव, शिरपूर पोलीस स्टेशनचे पीएसआय तायडे व पठाण यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीसाचे मानकरी गौरव सवडतकर (नागपूर), द्वितिय बक्षीसाचे मानकरी मोहन मोनू (नाशिक), तृतीय बक्षीसाचे मानकरी आकाश ठाकरे (अकोला ठाकरे), चौथ्या बक्षीसाचे मानकरी शुभम चव्हाण सुदी,पाचवे बक्षीस सूरज शिंदे, कोंडाळा झामरे तर प्रोत्साहनपर बक्षीस प्रेमानंद लादे यांनी पटकावले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी माजी सभापती मधुकर काळे, सरपंच लक्ष्मण जाधव,पोउपनिरीक्षक तायडे, पठाण, मुख्याध्यापक भारत लादे,संजय जाधव, रामेश्वर बाजड, किसन जाधव, विजु जाधव, एकनाथ लादे, महेश जाधव, लक्ष्मण जाधव, शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष समाधान जाधव, नंदकिशोर डिलर, अमोल जाधव, विनोद जाधव, उमेश जाधव,वैभव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अंम्बुलन्सची व्यवस्था डॉ. स्वप्नील लादे व त्यांचे सरकारी यांनी केली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय जाधव, ओम जाधव, पंकज लादे, प्रेमानंद लादे, ओम बाबुराव जाधव, सचिन लादे, मोहन जाधव, गजानन जाधव,कार्तिक लादे, आशुतोष जाधव, विजय लादे, अभिषेक झामरे, कर्तव्य काळे, आदित्य लादे, प्रवीण लादे, ओंकार लादे, हर्षल लादे, आदित्य बाजड, ज्ञानेश्वर लादे, ज्ञानेश्वर लादे, ज्ञानेश्वर काळे, सचिन शिंगणे, शुभम जाधव, सचिन जाधव, ज्ञानेश्वर जाधव, अभिषेक लादे, गोपाल लादे, ओम जाधव इत्यादीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रामेश्वर बाजड व ऋषिकेश जाधव यांनी केले. तर ओम जाधव यांनी आभार मानले.
