अन्यायाविरोधातील लढा – उपोषणाचा आज दुसरा दिवस

अन्यायाविरोधातील लढा – उपोषणाचा आज दुसरा दिवस पीक विम्याच्या न्याय्य मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस

प्रतिनिधी संग्रामपूर

खरीप 2024 च्या प्रलंबित पीक विम्याच्या न्याय्य मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.नवीन वर्ष उजाडूनही शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा अद्याप मिळालेला नाही, ही अत्यंत दुर्दैवी व संतापजनक बाब आहे.👉 जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.👉 क्लेम कॅल्क्युलेट होऊनही रक्कम न मिळणे म्हणजे शेतकऱ्यांवर होणारा सरळ अन्याय आहे.आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही आंदोलनकर्ते ठाम आहेत –जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही!🗣️ प्रशासनाने व विमा कंपनीने तात्काळ निर्णय घ्यावा🗣️ शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये✊ शेतकरी एकजूट – अन्यायाविरोधात लढा सुरूच राहील!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *