शिक्षण आणि संस्कार हेच नागरिक घडवण्याचं खरं माध्यम – डॉ.राजेंद्र फडके लोकमत न्यूज नेटवर्क

शिक्षण आणि संस्कार हेच नागरिक घडवण्याचं खरं माध्यम – डॉ.राजेंद्र फडके लोकमत न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी जळगाव जामोद-

विपरीत परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश मिळतेच,त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी.शिक्षणासोबतच संस्कार महत्त्वाचे असतात ते असले तरच भारताचा आदर्श नागरिक घडू शकतो असे प्रतिपादन बेटी बचाओ,बेटी पढ़ाओ या मोहिमेचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी केले. ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभात बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी होते तर जळगांव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, सचिव अनुप पुराणिक , पर्यवेक्षक प्रा.जी.एस.वानखेडे ,अधिक्षक संजय गाडेकर,कार्यक्रम अधिकारी प्रा.गणेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन,दीपप्रज्वलन, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.यावेळी दिव्या अहिर व स्नेहा गिऱ्हे यांनी स्वागत गीत गायीले.फेब्रु/ मार्च 2025 मधील कला व वाणिज्य शाखेतून व विविध विषयांमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी सर्वाधिक सोळा पारितोषिके नेहा संजय शेगोकार या विद्यार्थिनीने पटकावली तर माधुरी संतोष जुमळे हिने दहा बक्षिसे मिळविली तसेच जुबेरा अजगर गवालकर,कांचन महादेव हिस्सल,अस्मिता संतोष शिरसाट,प्रणाली रामेश्वर भालतडक,संदीप गणेश भोंगाडे,अक्षय सुनील खापरे, प्रतीक्षा रमेश भगत,आचल विजय बांगर व प्रणवी संतोष राऊत हे विद्यार्थी पारितोषिकाचे मानकरी ठरले.
सत्र 2025—26 चे आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिव्या गणेश अहिर व कोमल श्रीकृष्ण नळकांडे या विद्यार्थिनीने पटकाविला. प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.जी .एस .वानखेडे यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, सचिव अनुप पुराणिक, प्राचार्य डॉ.गिरीश मायी,अधिक्षक संजय गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनी नेहा शेगोकार व प्रणाली भालतडक या विद्यार्थ्यांनीनी आपले मनोगत व्यक्त केले . पारितोषिकाचे संचालन प्रा. रामेश्वर सायखेडे यांनी केले.तर कार्यक्रमाचे संचालन प्रा.राजीव देवकर यांनी केले.कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश जोशी यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.ऋषिकेश कांडलकर,प्रा.विनोद बावस्कार,प्रा.नीलिमा भोपळे , वरिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.गिरीश कुलकर्णी,प्रा.अर्चना जोशी,प्रा.संतोष कतोरे, प्रा.विनय उमरकर,प्रा.विठोबा देठे यांच्यासह समाधान निलजे, गजानन वानखडे,बाबुराव चव्हाण, हर्षद धर्म,योगेश तायडे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू ,विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *