खामगाव–जालना नवीन रेल्वेमार्गाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

खामगाव–जालना नवीन रेल्वेमार्गाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

जावेद शहा!खामगाव–जालना हा नवीन रेल्वेमार्ग गेल्या ११५ वर्षांपासून प्रलंबित असून, त्याच्या मंजुरीसाठी स्थानिक रेल्वे लोकआंदोलन समिती गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने संघर्ष व पाठपुरावा करत आहे. मराठवाडा व विदर्भाला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा रेल्वेमार्ग असून, तो चिखली मतदारसंघासह संपूर्ण परिसराच्या विकासासाठी कळीचा दुवा ठरणार आहे.या रेल्वेमार्गामुळे व्यापारी, शेतकरी बांधव, युवा वर्ग तसेच सामान्य नागरिकांना आधुनिक व सुलभ दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होतील. शेतकरी बांधवांना आपला शेतमाल मोठ्या बाजारपेठांपर्यंत नेणे सोपे होईल, परिणामी उत्पादनाला योग्य दर मिळण्यास मदत होईल. तसेच या मार्गामुळे औद्योगिक, व्यावसायिक व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन बेरोजगार युवकांना नोकरी व स्वयंरोजगाराचे मार्ग खुले होतील.ब्रिटिश राजवटीत १८९० च्या दशकात विदर्भ आणि मराठवाड्यातील व्यापार सुलभ करण्यासाठी सुचवण्यात आलेला खामगाव–जालना रेल्वे मार्ग आजही तितकाच महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने या मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व राज्य सरकारने केंद्राकडे प्रभावी पाठपुरावा करावा, अशी ठोस मागणी गेल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनात या प्रस्तावावर भाष्य करताना करण्यात आली. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या रेल्वे मार्गास आधीच मान्यता दिली असून, राज्य सरकार या प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ५०% हिस्सा उचलणार आहे.या महत्त्वपूर्ण प्रश्नासंदर्भात मी महाराष्ट्र विधानसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले आहे. तसेच मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *