
निषेध निषेध महाराष्ट्र सरकार, आदिवासी मंत्री व स्थानिक आमदार चैनसुख संचेती यांचा जाहीर निषेध, जाहीर निषेध
जावेद शहा : दिनांक 10 12 2025 रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर चालू असलेले उपोषण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर , टोकरे कोळी यांना संविधानाने दिलेले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता हे कोळी या नोंदीवरूनच सुलभतेने मिळावे या करता उपोषण आयोजित केले होते परंतु नतभ्रष्ट महाराष्ट्र सरकारने त्या उपोषणाची दखल न घेता पोलिसांच्या मदतीने दडपशाहीने व ते बेकायदेशीरपणे आंदोलन दाबून काढले.तसेच स्थानिक मलकापूर विधानसभा आमदार चैनसुख संचेती यांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी विधानभवनात आमचा मुद्दा उपस्थित केला नाही त्यामुळे मतदाना पुरता कोळी महादेव जमातीचा वापर करणाऱ्या त्या आमदाराचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो. आदिवासी मंत्री उईके यांचा सुद्धा जाहीर निषेध करतो . या महाराष्ट्रात एका विभागात वेगळा न्याय आणि दुसऱ्या विभागात वेगळा न्याय हा सरळ सरळ आमच्या कोळी महादेव, डोंगर कोळी, मल्हार कोळी,ढोर कोळी, टोकरे कोळी बांधवावर होणारा अन्याय आहे मग हे राज्य संविधानानुसार चालते किंवा नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या आदिवासी कोळी बांधवांना होणारा त्रास व आमच्या मुलाबाळांचे होणारे नुकसानाला सरकार जबाबदार राहील व होणाऱ्या पुढील परिणामास सुद्धा महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील या सर्वांच्या निषेधार्थ येणाऱ्या 26 जानेवारी 2026 पर्यंत जर आमचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही जलसमाधी आंदोलन इतर उग्र स्वरूपाचे आंदोलन व मतदानावर बहिष्कार करण्यात येतील असा सज्जड इशारा देण्यात येत आहे अशा प्रकारचे निवेदन आज एस डी ओ कार्यालय मलकापूर येथे देण्यात आलेले आहे…. मलकापूर नांदुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदाराचा जाहीर निषेध, आदिवासी मंत्र्यांचा सुद्धा जाहीर निषेध, महाराष्ट्र सरकारचा सुद्धा जाहीर निषेध
