
सततचे कर्जबाजारीपण आणि उत्पन्नाचे वाढते प्रश्न यामुळे एका शेतकऱ्याने अखेर जीविताला कंटाळून जीवन समाप्त केल्याची धक्कादायक घटना
सहसंपादन जावेद शहा
मलकापूर पांगा (ता. सिंदखेड राजा) येथे सततचे कर्जबाजारीपण आणि उत्पन्नाचे वाढते प्रश्न यामुळे एका शेतकऱ्याने अखेर जीविताला कंटाळून जीवन समाप्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष जनार्दन काकडे (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ३ डिसेंबरच्या रात्रीपासून ते घराबाहेर गेल्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती.
यानंतर सकाळी शेतात शोध घेण्यात आला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. काकडे हे गेल्या काही वर्षांपासून कापूस व सोयाबीन पिकांतील तोटा, नैसर्गिक संकटे, तसेच नातेवाईकांकडून घेतलेल्या कर्जामुळे आर्थिक अडचणीत होते. या तणावातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
या प्रकरणी मृताचे भाऊ जनार्दन काकडे यांच्या तक्रारीवरून साखरखेडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
