
जळगाव जामोद नगर परिषद निवडणूक:महिला कर्मचाऱ्यांचे पिंक सखी बूथ लक्षवेधक.
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी गजानन सोनटक्के
लोकशाहीच्या उत्सवात मतदारांना आनंदी वातावरणात मतदान करता यावे यासाठी दिनांक 03/12/2025 ला जळगाव जामोद येथील प्रभाग क्रमांक 10 मध्ये बूथ क्र. 10/2, दि न्यू इरा हायस्कूल जळगाव जा. येथे, चार आदर्श महिला कर्मचाऱ्यांनि “पिंक सखी बूथ “मतदान केंद्रावर पिंक संकल्पना राबवली. सलग पाचव्यांदा पिंक सखी बूथ ची संकल्पना जळगाव जामोद मध्ये राबविण्यात आली आहे. जळगाव शहरातील सर्व मतदान केंद्रांपैकी लक्षवेधक व आगळे वेगळे असे हे मतदान केंद्र ठरले, त्यामुळे या “पिंक सखी बूथ” चे सर्वत्र कौतुक होत आहे. नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये राजकीय स्तरावर आगळीवेगळी ठरली तसेच निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा निवडणुकीत विविध उपक्रम राबवून प्रशासकीय पातळीवर जिल्ह्यात आगळे वेगळे स्थान निर्माण केले. निवडणूक सुरू होण्यापूर्वीच दि. न्यू इरा हायस्कूलच्या प्रांगणात भव्य दिव्य,आकर्षक रांगोळी काढून मतदानात मतदारांची जनजागृती केली. तसेच मतदानाच्या दिवशी सुद्धा प्रभाग क्रमांक दहा/ दोन या बूथ वर चार आदर्श महिलांनी मतदान केंद्र सजवून पिंक रंगाने मतदारांसाठी स्वागत कमान गेट उभारून सेल्फी पॉईंट तयार करून मतदानाला येणाऱ्या सर्वांचे स्वागत केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या ठिकाणी सर्वत्र फुगे लावून वातावरण प्रफुल्लित करण्यात आले होते .निरक्षर मतदारांना विशेष डमी मतपत्रिकेदारे समजावून सांगून सहाय्य सखी बूथ ने केले. मतदान केंद्रामध्ये चारही महिलाच प्रतिनिधी कर्तव्यावर दिसून आल्या,त्यांनी कुठलाही अनुचित प्रकार बूथ वर होऊ न देता आपले कर्तव्य पार पाडले.या सखी बूथ चे नियोजन नगरपरिषद चे प्रशासन अधिकारी, डॉ .सूरज जाधव,जळगांवचे उपविभागीय तथा निवडणूक अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार पवन पाटील तथा न.प.चे लिपीक गजानन मोरे सर यांच्या विशेष सहकाऱ्याने सखी बूथ च्या महिला कर्मचाऱ्यांनी उत्साहाने केले.महिला कर्मचारी अनुक्रमे सौ.लीना घोटेकर, कु. नीलिमा डुकरे, कु.अस्मिता क्षीरसागर, कु.संध्या आखाडे ह्यांनी अतिशय चोखपणे आपले कर्तव्य बजावून निवडणूक कर्तव्य पार पाडले.
