
मडाखेड बु! येथे २० हजारांची देशी दारू पकडली… जळगाव जामोद पोलिसांची कारवाई…
जळगाव जामोद प्रतिनिधी
(दि.४)जळगाव जामोद पोलिसांनी तालुक्यातील ग्राम मडाखेड बुद्रुक येथे कारवाई करत २० हजार रुपये किमतीची देशी दारू पकडली आहे. नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार नितीन पाटील यांना दिनांक ४ डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मडाखेड बुद्रुक येथे सापळा रचण्यात आला होता.भेंडवळ बीट अंमलदार भागवत उंबरहंडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल डब्बे, प्रशांत डांमरे, गणेश हाडे व चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन मानकर यांनी ही कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या पार पाडली. यामध्ये देशी दारू संत्रा ५ हजाराच्या ९० एम एल च्या ५०० नग शीशा प्रत्येकी किंमत ४० रुपये प्रमाणे एकूण किंमत २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी विकी मसूरकार वय ३१ वर्ष राहणार जामोद यास ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात बीट अंमलदार भागवत उंबरंडे व गणेश हाडे करीत आहेत.
