
शालेय योगा स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदीर पळसखेड भटचे विद्यार्थी विभाग स्तरावर
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
दि. 09 सप्टेंबर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भट येथील 4 विद्यार्थी दिनांक 9 सप्टेंबर रोजी बुलढाणा क्रिडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत सहभागी झाले होते. यात 4 विद्यार्थ्यांनी विजय विजय मिळवला. सविस्तर वृत्त असे की, जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भट स्पोर्ट्स हब म्हणून ओळखले जाते. शाळेचे 27 विद्यार्थी मागील वर्षी राज्यस्तरावर होते तर पाच राज्यस्तरीय पदक शाळेला मिळाले होते. परंपरा कायम राखतं, आज बुलढाणा येथे झालेल्या जिल्हास्तरीय योगा स्पर्धेतील पारंपारिक योगा व कलात्मक योगा या प्रकारात शाळेचे 6 विद्यार्थी सहभागी झाले होते. यात कलात्मक योगा या प्रकारात श्रेयांशी अनिल सिरसाट, अमृता दत्तात्रय सिरसाट, अश्विन संतोष देशमाने व समर्थ देविदास पिंपळे या 4 विद्यार्थ्यांनी प्रथम येतं विजय मिळविला. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळी खेळत प्रती-स्पर्धकाला नमवत कलात्मक योगा प्रकारामध्ये विजय मिळवला. या विजयामुळे या विद्यार्थ्यांची विभागीय योगा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विजयाबद्दल संस्था अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके व शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयासाठी शाळेच्या योगा शिक्षीका प्राजक्ता चौधरी व क्रिडा शिक्षक भुषण सिरसाट यांनी मेहनत घेतली
