
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संवादाचा सोहळा सातपुडा शिक्षण संस्था
प्रतिनिधी जळगाव (जामोद)
येथे विद्यार्थी-पालक मेळावा उत्साहात साजरा*सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद द्वारा संचालित तथा डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.कृष्णरावजी इंगळे (अध्यक्ष, सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद) तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.हरिभाऊजी इंगळे (उपाध्यक्ष, सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद), डॉ.शेषरावजी भोपळे (सचिव, सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद), मा.श्री.नितीनजी सातव (मुख्य कार्यकारी अधिकारी, सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद), पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले श्री.अनंता पारसकर, प्रा.योगेश गवई (प्राचार्य, कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद), प्रा.राहुल तायडे (प्राचार्य, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई यांनी आपल्या प्रास्ताविकेतून कृषी अभ्यासक्रमाची माहिती तसेच तीनही महाविद्यालयांची उपलब्धी यावर संबोधन केले. सोबतच महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील आव्हाने व संधी यावर भर दिला आणि पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले.प्रमुख अतिथी डॉ.शेषरावजी भोपळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून कृषी शिक्षणाचा सार सांगून अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन केले. पालक प्रतिनिधी श्री.अनंता पारसकर यांनी सुद्धा आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त केले.अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष, सातपुडा शिक्षण संस्था मा.श्री.कृष्णरावजी इंगळे यांनी संबोधित करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या जीवनात पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, पालकांनी विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव न टाकता त्यांना पुढे जाण्यास प्रवृत्त करावे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, सामाजिक व मानसिक आरोग्य, डिजिटल माध्यमांचा योग्य वापर, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकास यावर सखोल मार्गदर्शन केले. सोबतच स्पर्धा परीक्षा, सरकारी व खाजगी नोकऱ्या, कृषी पूरक उद्योग यावरही प्रकाश टाकला.विद्यार्थी व पालक मेळाव्यास जवळपास ४०० हून अधिक विद्यार्थी व पालक, तीनही महाविद्यालयातील प्राध्यापक तथा कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.अनिकेत उमाळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.जिव्हेश साळी यांनी केले.
