
गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान जळगाव जामोद शहरातील वायलीवेस व तलावपुरा येथील काही भागात दी. 06.09.2025 रोजी जमावबंदी आदेश लागू
जळगाव जामोद प्रतिनिधी…
दिनांक १७/९/२०२४ रोजी गणपती विसर्जन मिरवणुक दरम्यान झालेल्या दंगलीमुळे आगामी गणेशोत्सव २०२५ मधील गणपती मिरवणुकीच्या वेळी सुध्दा सदर ठिकाणी लोकांची गर्दी होवुन एखाद्या समाजकंटका कडुन मिरवणुकीवर दगडफेक होवुन जातीय दंगल घडुन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून गणपती विसर्जन मिरवणुक मार्ग *#संत रुपलाल नगर ते वायलीवेस तसेच ताटीपुरा कडे जाणारा रोड व चौभारा गल्ली, तसेच तलावपुरा येथील खालीकबापु देशमुख यांचे घर ते प्रगटेश्वर शाळा न्हावीपुराकडे जाणारा रोड मंजुर यांचे घराकडे जाणारा रोड* या भागातील (मिरवणुक मार्ग वगळून) दोन पेक्षा जास्त लोकांनी एकत्रितरित्या फिरु नये असा आदेश मिरवणुक संपेपर्यंत लागु करण्यात आला आहे.पोलीस पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथील घटना लक्षात घेता जळगांव जामोद शहरामध्ये गणपती उत्सवा निमीत्य भव्य मिरवणुका काढण्यात येणार असुन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात मंडळे भाग घेणार असून मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होत असतात. त्यामुळे सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.आदेश कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना लागु होणार नाही.

