
मलकापूर डेपोला सुहास चवरे यांनी दिल्या २१८ मार्ग फलक पाट्या
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
राष्ट्रीय, धार्मिक, सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे सुहास (बंडूभाऊ) चवरे यांनी मलकापूर एस.टी. डेपोला २१८ मार्ग फलक पाट्या देवून सामाजिक दायीत्व जोपासले आहे.एसटी कर्मचारी तथा बंडूभाऊ चवरे यांचे मित्र सुनील मुंधोकार तथा अशोक शंखपाळ यांचेशी ते चर्चा करीत असतांना मलकापूर आगारात काही मार्ग फेरीच्या पाठ्यांची कमतरता असल्याचे समजले. या पाट्यांच्या कमतरतेमुळे प्रवाशांना गाडी कोठे जात आहे हे समजण्यास अडचणी निर्माण होत असल्याने अनेकदा अनेक प्रवाश्यांची गाडी चुकण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो व यामुळे एसटी महामंडाळाचे उत्पन्न सुध्दा बुडते. तेव्हा पाट्यांची समसया जाणून घेत सुहास (बंडुभाऊ) चवरे यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या नावाने नवीन २१८ मार्ग फलक (पाट्या) देण्याचा प्रस्ताव यावेळी मांडला. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी बंडुभाऊ यांनी मांडलेला प्रस्ताव वरिष्ठांकडे मांडला. त्यावर चर्चा करून बंडूभाऊंनी सामाजिक दायीत्व दाखवित मांडलेल्या प्रस्तावाला वरिष्ठांच्या मिळालेल्या मान्यतेनंतर तात्काळ सामान्य प्रवाशी, चालक, वाहक तथा परिवहन महामंडळचे सोईच्या दृष्टीने सर्व मार्गावरील नवीन पाट्या बनवून त्या सर्व पाट्या आगार व्यवस्थापक मुकुंद न्हावकर, लेखाकार गणेश चौधरी, टि.आय. सत्यजीत सावकाश, टि. आय. समीर देशमुख, सुनील मुंधोकार, अशोक शंखपाळ, लिपिक धर्मराज इंगळे, वाहतूक नियंत्रक अविनाश वंजारी, वाहन परिक्षक चालक विनोद रावणकार, शांताराम पाटील आदींच्या उपस्थितीत अॅड. सम्यक सुहास चवरे यांनी सुपुर्द केल्या.या कार्याचे सर्वांकडून अभिनंदन तथा कौतुक होत आहे
