
जीत-कुन-दो स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल चे 16 विद्यार्थी विभागस्तरावर
बुलढाणा जिल्हा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
दि 30 ऑगस्ट राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲन्ड ज्यु. क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड भट रायपूर येथील 16 विद्यार्थ्यांनी शालेय जीत-कून-दो स्पर्धेत चमकदार कामगिरी करत त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे सविस्तर वृत्त असे की, दिनांक 29 ऑगस्ट वार शुक्रवार रोजी जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपूर येथील विद्यार्थ्यांचा चमू बुलढाणा येथे झालेल्या जिल्हास्तरीय जीत-कून-दो स्पर्धेत सहभागी झाला होता. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रतिस्पर्ध्यां सोबत चुरशीची खेळी करत एकुण 16 स्पर्धकांनी विजय मिळवला. यामध्ये 14 वयोगटांमध्ये संजिवनी दांडगे, अश्विनी दांडगे, सोहम गव्हाणे, शिवम शेळके, आर्यन सिरसाट यांनी विजय मिळवला तर 17 वर्षे वयोगटात भक्ती गडदे, सावीत्री गायकवाड, रोशनी सावळे, धनंजय सोनाळकर, यश तरमळे, प्रथमेश गव्हाणे, सुमीत कुडके, प्रेमसिंग ठाकूर व 19 वयोगटात सानिका राजू धनवे, समता जाधव, शिवानी खंडागळे आदी विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला याबरोबरच त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या मिळवलेल्या विजयाबद्दल संस्था अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की, शिक्षणाबरोबरच खेळही महत्वाचे आहेत. खेळामुळे आत्मविश्वास वाढतो एकाग्रता वाढते. आहार व वेळेचा सदुपयोग करून सरावात सातत्य राखल्यास विजय मिळवता येतो व जिजाऊ ज्ञान मंदिरचा विद्यार्थ्यी हे सातत्याने साध्य करत आला आहे. या यशासाठी व पुढील स्पर्धेसाठी सर्व विजेत्यांना शुभेच्छा *या विजयामागे शाळेचे क्रीडा शिक्षक भूषण सिरसाट यांनी मेहनत घेतली. तसेच शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट व सर्व शिक्षक -शिक्षकेतर क�
