
निसर्ग निर्गुण निराकार पाणदेवाच्या यात्रेमध्ये माजी मंत्री आमदार संजयभाऊ कुटे यांच्यासह हजारो सत भक्तांनी घेतले हर्ष उल्हासात दर्शन
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
निसर्ग निर्गुण निराकार पाणदेवाची जामोद या ठिकाणी शेकडो वर्षापासून ऋषि पंचमीनिमित्त पाणदेवाची यात्रा गणेश चतुर्थी व ऋषिपंचमी या दोन दिवश यात्रा भरत असते या यात्रेला महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून हजारो सत भक्त तथा भाविक येत असतात तसेच पाणदेव मंदिर संस्थान जामोद येथे दररोज 200 ते 300 भाविक सत भक्त दर्शन घेत असतात पाणदेवा कडे आपल्या मनोकामना व्यक्त करतात या यात्रेत निसर्ग निर्गुण निराकार पाणदेवाचे मंदिर जामोद येथे असून गणेश चतुर्थीला पूजाअर्चा करून सर्व सत भक्त महाप्रसाद घेतात यानंतर रात्री रात्रभर आरत्यांचा कार्यक्रम होऊन ऋषिपंचमीच्या दिवशी सकाळी पाच वाजता धरम ध्वज चढविल्या जातो त्यानंतर सर्व सदभक्त पाण्याची पूजा करण्याकरिता वसाळी या गावापासून फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या परवानगीने अरण्यात सकाळी सात वाजता प्रवेश करून पिंपळ स्थळ या ठिकाणी अरण्य सात ते आठ किलोमीटर उंच शिखरावर पोहोचून पिंपळ स्थळ या ठिकाणी जातात तेथे दोन बाजू ला दोन पाण्याचे तळे असून एका तळ्यात पाणी व माती असून दुसऱ्या तळ्यामध्ये निर्मळ पाणी आहे दोन्ही तळ्याच्या चारही बाजूने पिंपळ वृक्षाची झाडे दिसून येतात त्यामुळे सदर ठिकाणाला पिंपळ स्थळ असे नाव पडले असावे असे सदभक्त सांगतात माती पाण्याचे तळ्यात सर्व सतभक्त भाविक आंघोळ करून पाण्याच्या तीर्थाचे घट भरतात आणि होम पेटवून तळ्यातील माती आणि पाण्याचे पूजा करतात नंतर येथील तीर्थ भरलेले घट जामोद या ठिकाणी निसर्ग निर्गुण निराकार पाणदेव मंदिरात पोहोचून आणलेल्या गटातील पाणी मंदिराच्या पंचतत्वाच्या गादीवर टाकून व नंतर पाण्याने भरलेल्या पालखीची व पाणदेवाचे पूजन करून महाप्रसाद घेऊन आपापल्या घरी पोहोचतात. आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. ही यात्रा शांततेत पूर्णत्वास नेण्याकरिता जळगाव जामोद पोलीस डिपारमेंट व फॉरेस्ट डिपार्टमेंट अधिकारी यांनी महत्त्वाचे सहकार्य करून शांततेत पार पाडली तसेच यात्रा शांततेत पाडण्याकरिता पाणदेव मंदिर गुरु बाबा अवधूत तायडे, रामदास गवई, अध्यक्ष बलदेव तायडे, उपाध्यक्ष तुळशीराम वाघोदे, सचिव भीमराव तिजारे, सहसचिव ज्ञानेश्वर पारवे , कोषाध्यक्ष राजूभाऊ डोंगरदिवे, सल्लागार गौतम गवई यांच्यासह जामोद वासियांनी परिश्रम घेऊन यात्रेच्या कार्यक्रमाचा यशस्वीरित्या पार पाडला
