जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरापिंपळगाव सराई

जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरापिंपळगाव सराई

प्रतिनिधी बुलडाणा तालुका जावेद शहा

२९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी भूषविले तर प्रमुख वक्ते म्हणून सुदाम चंद्रे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व क्रीडा साहित्य पूजनाने झाली.प्रमुख वक्ते सुदाम चंद्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महान खेळांडुंकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. खेळ हे केवळ शारीरिक तंदुरुस्तीचे साधन नसून व्यक्तिमत्त्व घडविणारे माध्यम आहे.”अध्यक्ष प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “आपण मेहनत करून एखाद्या खेळामध्ये प्राविण्य मिळवून नाव कमवावे, म्हणजे हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा होईल.” त्यांनी कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत प्रश्नोत्तरांचा मनमोकळा कार्यक्रम घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडादिनाचे महत्व अधिक स्पष्टपणे समजले.कार्यक्रमात क्रीडा शिक्षक विकास गवई मंचावर उपस्थित होते.सायली खंडागळे यांनी प्रास्ताविक केले.सोनम मुकलवार (वर्ग १० अ) हिने सूत्रसंचालन केले, तर श्रद्धा बैरागी (वर्ग १० अ) हिने आभार मानले.या कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *