नालीवरील ढापामुळे सांडपाणी रस्त्यावर मलकापूर

नालीवरील ढापामुळे सांडपाणी रस्त्यावर मलकापूर

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर : येथील पोलीस चौकीनंबर एक समोरील छोटा दरवाजा च्या आतील नाली व ढापा जाम झाल्यामुळे नाली मधील सर्व सांडपाणी रोडवर वाहत आहे. नगर पालिका कर्मचाऱ्यांनी आठ ते दहा वेळेस ती नाली साफसफाई केली परंतु नालीच्या आत ढाप्याखाली घान अटकल्यामुळे सर्व सांडपाणी रोडवर वाहत आहे, त्यामूळे दुर्गा नगर, छोटा बाजार, नस्वाला चौक येथील नागरिकांना नालीच्या सांडपाण्यातून ये जा करावे लागत आहे, तरी धापा तोडल्याशिवाय पर्याय नाही तो तोडून नवीन नाली व ढापा बांधणे गरजेचे आहे. परंतु प्रशासन हे फक्त सफाई कामगार यांना साफ सफाई करण्याकरता पाठवते तरी प्रशासनाने आठ दिवसात हे नाली व ढापा तोडून नविन बांधण्यात यावा अन्यथा लोकशाही मागनि आंदोलनचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *