रस्त्यासाठी येनगांव ग्रामस्थाचे दुसऱ्यादा आमरण उपोषण

रस्त्यासाठी येनगांव ग्रामस्थाचे दुसऱ्यादा आमरण उपोषण.

जळगाव जामोद प्रतिनिधी


येनगांव येथील बस स्टॉप ते गावा पर्यंतचा रस्ता 22 वर्षा पासुन झालेला नाही. खराब रस्त्यामुळे गांवकर्याना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात गावापासुन बस स्टॉप पर्यंत 1 किलोमीटर शाळकरी मुलांना पहाटे पाण्यातुन, रस्ता नसल्यामुळे घाणीतुन पायी याव लागत. 22 वर्षापासुन गावाला रस्ता नाही तरीही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहित. 26/2/2025 रोजी पहिल्यांदा आमरण उपोषण केले होते तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यानी भेट देऊन अधिवेशना नंतर रस्ता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु अधिवेशन होऊन 2 महीने उलटून सुद्धा कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे 3 जुन 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला गांवकर्यानी निवेदन देऊन उपोषणाचा ईशारा दिला होता. त्यामुळे आज 10 जुन 2025 पासुन येनगांव ग्रामस्थानी आमरण उपोषणाला सुरुवात केली. उपोषणास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, अशोक मुरुख, कॉंग्रेसचे अब्दुल जहिर, मिलिंद वानखड़े, तुकाराम वाघ, अकील शाह, नीलेश इंगळे यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *