महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना

नागेश सुरंगे अकोला-

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना ही ०१ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५ दरम्यान सलग तीन महिने ऑनलाइन पद्धतीने वीज देयक भरा आणि बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध होती.ह्या योजनेचा कालावधी पाच महिने होता जानेवारी २०२५ ते ३१मे २०२५ पर्यंत तसेच यापैकी एप्रिल -२०२५,मे-२०२५ आणि जून-२०२५अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा अशी लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येईल.ही योजना प्रत्येक तालुक्यात उपविभागीय स्तरावर उपलब्ध होती.प्रथम बक्षीस स्मार्टफोन एक,दुसरे बक्षीस स्मार्टफोन दोन,तिसरे बक्षीस स्मार्ट घड्याळ दोन अशी एकूण पाच लकी ड्रॉ ऑनलाईन बक्षिसे होती.प्रथम एप्रिल २०२५ चे बक्षीस ऑनलाईन पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात आले असता मंगरूळपिर येथील श्री माणिकराव गंगावणे गुरूजी यांचा लकी ड्रॉ नंबर लागला. आणि त्यांना प्रथम बक्षीस स्मार्टफोन सॅमसंग कंपनी चा ऑनराईड मोबाईल फोन ११४९९ ₹ किंमतीचा आज दिनांक ९ जून २०२५ सोमवार ला एम .एस .ई.बी.मंपीर चे अधिकारी श्री अमीन हुसेन शहा सहाय्यक लेखापाल उपविभाग महावितरण मंगरूळपिर यांच्या हस्ते देण्यात आला.सदर योजना महावितरण च्या वतीने ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करण्यास प्रोत्साहित करण्यापैकी एक आहे.सदर योजनेबाबत ग्राहकांनी जागरूक राहून ऑनलाईन पद्धतीने आपले वीज देयक भरावी . आणि भविष्यात या योजनेचा इतर ग्राहकांना योजना आल्यास निश्चितच फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *