ज जा शहरामध्ये बोगस बियाण्याचे मोठा साठा जप्त कृषी अधिकारी यांनी घरावरती छापा टाकून बोगस बियाणे केले जप्त

बोगस कपाशी बियाण्याची विक्री एकास अटक..जिल्हा कृषी भरारी पथकाची संयुक्त कारवाई…

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

.बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद येथे अवैध व अनधिकृत HTBT कापूस बियाणे विक्री करणाऱ्या एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, गणेश आप्पासाहेब सावंत, यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जळगाव जामोद येथील आचल नगर येथे एक इसम आपल्या घरात अनाधिकृत बोगस बियाणे विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने. या माहितीच्या आधारे, जिल्हा निरीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांच्या मान्यतेने सापळा रचण्यात आला होता.दोन पंच,धिरज वाकोडे, सुनील पवार (तालुका कृषी अधिकारी खामगाव) आणि धनंजय देवकर (लिपिक), तसेच प्रमोद गायके (मोहीम अधिकारी), रमेश जाधव (तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद), आणि कृष्णा भगत (कृषी पर्यवेक्षक) यांच्यासह गणेश सावंत हे आचल नगर, जळगाव जामोद येथे दिनांक 11 जून दुपारी ४ वाजता पोहोचले. तिथे अशोक रामभाऊ रंदाळे (वय ३९, व्यवसाय सेल्समन, रा. आचल नगर जळगाव जामोद) आपल्या घरात अनधिकृत बियाणे विक्री करताना मिळून आला.चौकशी केली असता,अशोक रंदाळे याच्याकडे बियाणे विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्याने हे बियाणे सुनगाव येथील सुखकर्ता कृषी केंद्रातून आणल्याचे सांगितले. त्याच्या घराची झडती घेतली असता, खालीलप्रमाणे अनधिकृत बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली: * RACI 659-5G f1 Hybrid Cotton: * Ajeet-5-4G PREMIUM COTTON HYBRID SEEDS: * YODHDHA PINK GUARD HYBRID COTTON SEEDS WITH NEW TECHNOLOGY: एकूण ५९ पाकिटे जप्त करण्यात आली असून, यापैकी कोणत्याही पाकिटावर उत्पादक, प्रक्रियाकर्ता किंवा विक्रेता यांचा उल्लेख नव्हता. ही पाकिटे शासनाने अनाधिकृत केलेली असून, त्यांच्या विक्रीद्वारे शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती. जप्त केलेल्या पाकिटांमधून प्रत्येकी दोन पाकिटांमधील प्रत्येकी तीन नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी सीलबंद करण्यात आले आहेत.या प्रकरणी, अशोक रामभाऊ रंदाळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३३६(४), ३४०(२) अंतर्गत, बियाणे नियम १९६८ च्या कलम ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, ३८ अंतर्गत, बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ च्या खंड ३, ९ अंतर्गत, बीज अधिनियम च्या कलम ७(a), ७(c), ७(d) अंतर्गत, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ च्या कलम ७, १५, १६ अंतर्गत, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३, ७, ९ अंतर्गत, आणि वजन व मापे पॅकेज केलेल्या वस्तू नियम १९७७ च्या कलम ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र कापूस बियाणे २००९ कलम १२ (९) आणि कापूस बियाणे किंमत नियंत्रण अधिनियम आदेश २०१५ कलम ५ हे देखील लागू आहेत.सदरची कार्यवाही प्रमोद लहाळे (विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती), मनोजकुमार ढगे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा) आणि बाळासाहेब व्यवहारे उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

2 thoughts on “ज जा शहरामध्ये बोगस बियाण्याचे मोठा साठा जप्त कृषी अधिकारी यांनी घरावरती छापा टाकून बोगस बियाणे केले जप्त

  1. Hello marathisamacharnews24.in,

    I visited your website online and discovered that it was not showing up in any search results for the majority of keywords related to your company on Google, Yahoo, or Bing.

    Do you want more targeted visitors on your website?

    We can place your website on Google’s 1st Page. yahoo, AOL, Bing. Etc.

    If interested, kindly provide me your name, phone number, and email.

    Well wishes,
    Nishant Sharma | Digital Marketing Manager

    Note: – If you’re not Interested in our Services, send us “opt-out”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *