
हैदराबाद-भावनगर रेल्वेगाडी थांब्याचे उद्घाटन
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर नगरीमध्ये हैदराबाद ते भावनगर या हॉलिडे सुपरफास्ट गाडीला थांबा मिळाल्याने त्या थांब्याचे उद्घाटन आज ३१ मे रोजी रेल्वे स्थानकावर मोठ्या उत्साहात आ. चैनसुख संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.जिल्हा प्रवासी सेवासंघ व तालुका प्रवासी संघाच्या पाठपुराव्यामुळे व केंद्रीयमंत्री ना.श्रीमती रक्षाताई खडसे, आ.चैनसुख संचेती यांच्या अथक प्रयत्नातून गाडी नं. ०७०६१ ०७०६२ या हैदराबाद-भावनगर विशेष गाडीचा थांबा मलकापूर रेल्वे स्थानकावर मंजूर करण्यात आला. त्यानिमित्ताने आज त्या गाडीच्या – थांब्याचा उद्घाटन सोहळा – आ. चैनसुख संचेती यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भुसावळ रेल्वेचे डिसीएम भानुदास तपस्वी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष यशकुमार संचेती, झेडआरयुसीचे सदस्य अनिरूध्द कुळकर्णी, सागरसेठ कोचर, भरतसेठ दंड, सुहास चवरे, अशोक कुमार, नेमीचंद वर्मा, संदीप जाधव, जिवनलाल झाबक, संतोष संचेती, शेखर धरणगावकर, पारसमल झाबक, अॅड. महेंद्र बुरड यांचेसह आदींची उपस्थिती होती.यावेळी मलकापूर स्थाकावरदुपारी १ वाजता गाडीचे आगमन झाल्यानंतर आ. चैनसुख संचेती व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गाडीला हिरवी झेंडी देवून थांब्याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी मलकापूर रेल्वे स्थानकाच्या विकासात्मक कामे व अडीअडचणी याबाबत विचार प्रकट केले. त्यानंतर जेष्ठ पत्रकार रमेशभाऊ उमाळकर, हरी गोसावी व मनोज पाटील यांचा जिल्हा प्रवासी संघाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
