
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 300 वा जन्मजयंती सोहळा उत्सव साजरा
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर शहरातील काँग्रेस कमिटीच्या वतीने आज अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव साजरा करण्यात आला तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, जिल्हा काँग्रेस कमिटी तथा मलकापुर मतदार संघाचे जेष्ठ नेते मा आमदार राजेशजी एकडे, डॉ अरविंदजी कोलते, अॅड साहेबरावजी मोरे यांचे मार्गदर्शन अनुसार माजी नगराध्यक्ष अॅड हरीशजी रावळ तथा शहराध्यक्ष राजूभाऊ पाटील यांचे नेतृत्वात, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ता मंडळी, नागरिक तथा श्री धनगर समाजाचे सम्माननीय जेष्ठ सदस्य व सम्माननीय युवक सहकारी यांचे विशेष उपस्थितित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 300 वा जन्मजयंती सोहळा श्री हुतात्मा स्मारक मलकापुर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा आला.. त्यावेळी युवा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
