सर्वात मोठी ग्रामपंचायत असताना या ग्रामपंचायतीचे सुनगाव येथील साफसफाई कडे व लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

सुनगाव ग्रामपंचायत चे साफसफाई कडे दुर्लक्षवार्ड नंबर एक मध्ये घाणीचे साम्राज्य

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे

जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असताना या ग्रामपंचायतीचे सुनगाव येथील साफसफाईकडे व लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र वॉर्ड नंबर एक मध्ये दिसत आहेत सुनगाव येथील मुख्य प्रवेश द्वारा जवळच पाण्याचे डबके साचलेले आहे येथील सांडपाण्याच्या व पावसाचे पाणी जाण्याच्या नाल्यांची व्यवस्था केलेली नाही व ठिकठिकाणी ग्रामपंचायतने रोड खोदून ठेवलेले आहेत व पंधरा ते वीस दिवस होऊन रस्त्याचे काम करत नसल्याने नागरिकांना जाण्यास त्रास होत आहे व ठीक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत त्यामुळे त्यामधून दुर्गंधी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहेत अशातच अवकाळी पावसाचे आगमन झाल्यामुळे येथील नाल्यांचे पाणी हे कित्येक नागरिकांच्या घरात घुसलेले आहे तरी सुनगाव येथील नागरिक संजय निमकर्डे यांनी वारंवार सरपंच व ग्रामसेवक यांना सांगूनही ती उड वाउडवीची उत्तरे देत आहेत व या

परिसरामध्ये सफाई कामगार हे योग्यरीत्या साफसफाई करीत नसल्याचे व परिसरात कचरा गाडी येत नसल्याचे संजय निमकर्डे यांनी सांगितले आहे तरी वार्ड नंबर एक मधील सदस्यांनी व सुनगाव ग्रामपंचायत ने याकडे लक्ष द्यावे व जेणेकरून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *