
शांती आरोग्यम् हाॅस्पिटल चे अवैध बांधकाम कारवाई संदर्भात विचारणा केली असता रचनाकार यांची ॲक्ट्रासिटी च्या खोट्या गुन्हात अडकविण्याची धमकी प्रहार जनशक्ती चे उपजिल्हाप्रमुख अजय टप यांची शहर पो.स्टेत तक्रार
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
शांती आरोग्यम् हाॅस्पिटल रचनाकार विरुद्ध गुन्हा दाखल मलकापुर:- शहरातील चाळीस बिघा परीसरातील शांती आरोग्यम् हाॅस्पिटल ने केलेल्या अवैध बांधकाम वर काय कारवाई केली या संदर्भात माहिती घेण्यासाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा उपप्रमुख अजय टप आज दि.22 मे रोजी नगरपालिकेतील बांधकाम विभागाच्या नगररचना विभागातील शिरीष बडगे यांचे कडे गेले, बडगे यांना अवैध बांधकाम संदर्भात कार्यवाही बाबत विचारणा केली असता मला याबाबत पुन्हा विचारणा केली तर जातिवाचक शिविगाळ केल्याची खोटी तक्रार शहर पोलिसांत देण्याची धमकी दिली .अजय टप यांनी शहर पोलिसांत तक्रार दिल्यावरुन शिरीष बडगे यांचे विरुद्ध कलम 351(2) अन्वये शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.
