वनविभागाची दबंग कामगिरी अवैध सागवान 7 नाग विनापरवाना जप्त केले

वनविभागाची दबंग कामगिरी अवैध सागवान 7 नाग विनापरवाना कारेडी नदीच्या पुलावर जप्त केले 3 आरोपी अटकेत

प्रतिनिधी जळगाव जामोद

वनपरिक्षेत्रातील जामोद वर्तुळात वनरक्षक राहुल तायडे व वनरक्षक अमोल हिवाळे यांनी वनांमधुन अवैध सागवान चोप अवैधरित्या विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ३ आरोपींना पकडले आहे.१५ एप्रिल रोजी जामोद वनपरिक्षेत्रामध्ये रात्र गस्त करीत असताना वनपाल अतुल बडगुजर यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी आपले सहकारी अमोल हिवाळे व वनरक्षक गव्हाणे व इतर वनकर्मचाऱ्यांसह कुवरदेव जामोद रोडवरील कुवरदेव नदी पुलावर नाकाबंदी केली वसमोरून येणाऱ्या संशयित मोटरसायकल स्वारांना थांबवून विचारणा केली यावेळी दोन्ही मोटरसायकलची झडती घेतली असता त्यावर ७ सागवान चोप मिळून आल्या त्याबद्दल आरोपींना विचारणा केली आहे. परंतु त्या सागवान चोपचे कोणताही वाहतूक परवाना त्यांच्याजवळ उपलब्ध नव्हता.म्हणून तीनही आरोपींना वनपाल बडगुजर व अमोल हिवराडे वनरक्षक राहुल तायडे वनरक्षक यांनी ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकलींसह ४९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून तीनही आरोपी युसुफ खान बाबा खान, शाकीर खान युसुफ खान व शेख सलीम शेख रफिक हे सर्व राहणार जामोद यांना १५ एप्रिल रोजी अटक केली. आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२, ५२, ६१ (अ), ६५ (अ) महाराष्ट्र वन नियमावलीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायला समक्ष हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना १९ एप्रिल पर्यंत वन कोठडी सुनावली ही कारवाई डीसीएफ गवस मॅडम, एसीएफ आपेट मॅडम, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांच्या मार्गदर्शनात वनपाल अतुल बडगुजर, अमोल हिवाळे, वनरक्षक राहुल तायडे, वनरक्षक कुशोळ, वनरक्षक हागवणे, वनरक्षक गव्हाणे यांनी केली असून पुढील तपास वनपाल अतुल बडगुजर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *