गजानन महाराज उत्सव सेवा ट्रस्ट च्या वतीने पारायण सोहळा

गजानन महाराज उत्सव सेवा ट्रस्ट च्या वतीने पारायण सोहळा

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे

मलकापूर येथे दोन दिवसीय श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण आयोजित केले आहे.या परायनाची विशेषतः म्हणजे सदर पारायण नऊ वर्षीय बालिका करणार असून तिचा गजानन विजय ग्रंथ पूर्ण तोंडपाठ आहे.   श्रींच्या अद्भुत व अलौकीक कृपाप्रसादाने पुलकीत ९ वर्षीय मुखोद्गत वाचक कु. सुरभी भाग्यश्री सुनिल ढगे यांच्या स्वर शैलीत दोन दिवसीय सामुहीक विजय ग्रंथ पारायण सोहळा दि.१७/४/२५ गुरूवार संध्या ४ ते ७ तसेच दि.१८/४/२५ शुक्रवार सकाळी ७ ते ११ पर्यंत राहील.कार्यमाचे स्थळ गौरीशंकर मंदिराचे प्रांगण, नांदुरा रोड, मलकापुर जि. बुलढाणा हे असून परायणा करिता भक्तांनी गजानन विजय ग्रंथ व आसन सोबत आणावयाचे आहे,पारायणकर्ती कु. सुरभी माऊली मुखोद्रत सांगतील आणि भक्तांनी बोट ठेवुन नजरेने मुक पारायण करायचे आहे.तरी गजानन भक्तानी जास्थित जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सौ.विद्याताई भीमराव वानखडे,सौ.राजश्री राजेश महाजन व श्री संत गजानन महाराज उत्सव सेवा ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *