
राशन दुकानातला गहू, तांदूळ थेट व्यापार्यांच्या घशात सरकारी राशन ठरते व्यापार्याचे पोषण जळगाव जामोद तालुक्यामधून मध्यप्रदेशामध्ये तांदूळ पोहोचल्या जातो
शासनाच्या वतीने धान्य दुकानातून मिळणारे मोफत राशन त्यात गरजू, निराधार, अंतोदय व इतर योजनेतून कुटुंबाला महिण्याभराची पोटाची खळगी भरावी म्हणून धान्य दिले जाते. बहिणींचा सन्मान म्हणून सनासुदीला राशन दुकानातून साडी पण दिली जाते. परंतु या गरिबांच्या तोंडचा घास हिसकावणारे राशन माफिया जिल्ह्यात सक्रिय आहेत. खुलेआम राशन दुकानापुढे आपले चारचाकी वाहन लाऊन व तालुक्यात ट्रेडर्स च्या नावाखाली लाभार्थ्यांचा राशन कवडीमोल भावात आपल्या घशात नेतांनाचे वास्तव चित्र जळगाव जामोद तालुक्यामध्ये पाहायला मिळते आहे.

रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात टू व्हीलर वरती महाराष्ट्र मधील मध्यप्रदेशामध्ये जाताना सडक वरती पडलेला तांदूळ
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गरिबांचे राशन हे माफिया आपल्या घशात घालून मालामाल झाल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यात जळगांव जामोद तालुक्यातील मध्यप्रदेश सिमेवर गहू तांदूळ माफियांचे मोठे जाळे सक्रिय आहे. खुलेआम लाभार्थ्यांचा राशन मोठ मोठी दुकाने लाऊन सार्वजनिक वितरण विभागाचे अधिकारी यांना चिरिमिरी करुन गोरखधंदा उभा केला आहे. तालुक्यातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांची मात्र खुली सुट पाहायला मिळते आहे. याकडे जिल्हा अधिकारी व संबंधित विभागाचे जिल्हा पुरवठा

अधिकारी यांनी लक्ष घालून व्यापार्यांच्या घशात जाणारे गरिबांना राशन यावर अंकुश घालावा अशी गोरगरीब व सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी होत आहे.लाभार्थी का विकतो धान्य? एकीकडे गरिबीचे निर्मूलन व्हावे म्हणून शासन राशन च्या माध्यमातून मोफत धान्य दिले जाते. परंतु कुंटुबात तरुण मुले शिक्षण घेत असल्याने त्यांच्या शिक्षणाचा बोजा पार करने कठीन होत आहे. मोलमजूरी करणारे कुटुंब मुलाच्या शिक्षणासाठी राशन दुकाणातून मिळणारे मोफत राशन विकुन मुलाची शैक्षणिक भुक भागवत आपल्या पोटाची खळगीला चिमटा लाऊन भयाण जिवण जगत आहेत. याकडे शासन प्रशासन लक्ष घालून गरिबांना धान्य विकण्यापासून परावृत्त करावे. व्यापारी कसा होतोय मालामाल
गरिब कुटुंबातील अठराविश्व दारिद्र्य बघून व्यापारी हा संधीचा फायदा घेत कवडीमोल भावात धान्य खरेदी करत त्या धान्याला राईस मिल येथे पाॅलिस करुन चढ्या भावाने मोठ्या बाजारपेठेत विकल्या जात जात आहे. यातून त्याला लाखो रुपयाचा फायदा होत आहे.याची पाळेमुळे शोधून तालुक्यातील तहसीलदार व जिल्हा अधिकारी आणि पूरवठा अधिकारी यांनी खोड मोडावी अशी मागणी जनता करित आहे
