
डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनीलजी उंबरकर यांनी शेगांव तालुका उपाध्यक्ष अमीन शेख यांना पुत्रप्राप्ती निमीत्त दिल्या हॉस्पीटल मध्ये जाऊन शुभेच्छा
अमिन शेख सहसंपादक
अकोला – 30/3/2025 रोजी डिजिटल मिडिया परिषद शेगांव तालुका उपाध्यक्ष अमीन शेख यांना ईदच्या शुभ मुहूर्तावर पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, त्यानिमित्ताने मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिलजी उंबरकर व शेगांव तालुका अध्यक्ष विवेक शेगांवकर यांनी अकोला येथे हॉस्पीटल मध्ये जाऊन अमिन शेख यांची भेट घेऊन त्यांच्या बाळाची व पत्नीची विचारपूस केली. तसेच अनिल उंबरकर व विवेक शेगांवकर यांनी अमिन शेख यांच्या बाळाची ट्रीटमेंट करत असलेल्या डॉक्टरांची भेट घेऊन डॉक्टरांना योग्य रीतीने उपचार करण्याचे सहकार्य करावे अशी विनंती केली.पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी, ईदच्या सणाला शेख अमीन यांना डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिलजी उंबरकर व शेगांव तालुका अध्यक्ष विवेक शेगांवकर यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या..
