बुलेरो, एस.टी. बस आणि खाजगी ट्रॅव्हल्स तिहेरी अपघात

बुलेरो, एस.टी. बस आणि खाजगी ट्रॅव्हल्स तिहेरी अपघात नंतर केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन जखमींना उपचार सुविधा आणि शव नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यासंदर्भात केल्या सुचना

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव महामार्गावर झालेल्या तिहेरी भीषण अपघातातील मृतकांच्या प्रति दुःखत संवेदना व्यक्त करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याच्या दृष्टिकोनातून तात्काळ कारवाई करण्याची निर्देश केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा चिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांना दिल्यात. दुपारी 1 वाजेपर्यंत रुग्णालयाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती…बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव महामार्गावर बोलेरो गाडी आणि एस.टी महामंडळाची पुणे परतवाडा बसचा सकाळी 5 वाजेच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला. त्याचवेळी पाठीमागून आलेली खाजगी ट्रॅव्हल्स ही जाऊन धडकली या तिहेरी भीषण अपघातामध्ये पाच जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर अपघातातील 24 जणांना खामगाव येथील शासकीय उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. तर यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.भागवत भुसारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेत. सोबतच अपघातातील मृतकांचे शव त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द करण्याच्या सूचनाही दिल्यात. दरम्यान जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.भागवत भुसारी यांनी खामगाव येथील जिल्हा उप सामान्य रुग्णालयाला भेट दिली. दुपारी एक वाजेपर्यंत अपघातातील शव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जखमींवर जिल्हा उप सामान्य रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *