तीन परीक्षांमधील यशानंतर दिनेश चौथ्यावेळी पीएसआयपदी

तीन परीक्षांमधील यशानंतर दिनेश चौथ्यावेळी पीएसआयपदी

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर : जिद्द चिकाटी व अभ्यासातील सातत्यामुळे मंत्रालयात लिपिक टंकलेखकची नोकरी मिळवल्या नंतरही स्वस्थ बसता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत टॅक्स असिस्टंट, महसूल सहाय्यक या परीक्षेत यश मिळवत आता मात्र पीएसआय च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत मलकापुरातील २९ वर्षीय दिनेश भदाने या प्रेरणादायी तरुणाने तरुणाई समोर मनासारखे यश मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही असा नवा पायंडा रचला आहे. स्थानिक दसरखेड एमआयडीसीतील बॅन्जो केम. या कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर सुनील भदाणे यांच्या दिनेश नामक मुलाने एमपीएससी परीक्षा द्यायचे ठरवले. सुरुवातीला खाजगी कंपनीत जॉब करून एमपीएससी चे क्लासेस लावले. प्रारंभी २०२२ मध्ये मंत्रालयात लिपिक टंकलेखक या पदाची परीक्षा पास होऊन तो सरकारी नोकरीत रुजू झाला. ही नोकरी मिळवण्याकरिता त्याने तब्बल १६ ते १८ तास अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. नोकरी मिळवून सुद्धा त्याने एमपीएससी परीक्षेकडे दुर्लक्ष केले नाही. सन २०२३ मध्ये टॅक्स असिस्टंट ची परीक्षा पास केली. तद्वतच महसूल सहाय्यक ची सुद्धा परीक्षा पास केली. यानंतर पीएसआय ची परीक्षा पास केली. आता पीएसआय चे ट्रेनिंग करिता जायचे ठरवत दिनेश ट्रेनिंग नंतर पीएसआय म्हणून रुजू होणार आहे. दरम्यानच्या काळात ऑनलाइन अभ्यासक्रम व अभ्यासक्रमाशी निगडित पुस्तकांचे वाचन करण्यावर त्याने अधिक भर दिला. किंबहुना अभ्यासाकरिता त्याने वेळ काढला. त्यामुळेच त्याला एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळाले. ही बाब सांगताना त्याचे वडील सुनील भदाने यांचे अभिमानाने मन भरून येते. शहरातील गणपती नगर भागात स्थित झालेल्या भदाने परिवारातील दिनेश भदाणे याने एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवित मलकापूर नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत त्याचे यश स्पर्धा परीक्षची तयारी करत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याकरिता प्रेरणादायी ठरणारे आहे. लक्ष पूर्ण होईपर्यंत थांबू नका किंबहुना जिद्द, चिकाटी व परिश्रम करतांना अभ्यासात सातत्य ठेवा, निश्चितच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी भावना सुद्धा दिनेशने ठासून व्यक्त केली. चौकट : दिनेश भदाणे एमपीएससी द्वारा पीएसआय ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल मलकापूर तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख विजय साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिनेश भदाने याचा वडिलांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख विजय साठे तथा कामगार सेना तालुका प्रमुख संतोष साठे या बंधूंनी शाल व श्रीफळ देऊन दिनेश भदाणे चा सन्मान केला. तर उपस्थित पत्रकार मनोज पाटील, नागेश सुरंगे यासह शिवसेना पदाधिकारी विनोद बोदडे, संदीप नरवाडे, धनराज पाटील, उमेश सोनवणे, राहुल बोरले, यूसूफभाई, प्रदीप नरवाडे, प्रवीण शेळके, रमेश वाघे, मनोहर पाटील, गणेश बोंडे, मंगेश ठाकूर, गणेश पाटील, ज्ञानेश्वर ठोंबे, संभाजी पाटील, ऋषिकेश डोसे, सौरभ पाटील, विराज साठे, वासुदेव जोगी आदींनी दिनेश भदाने यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *