
प्रजासत्ताकदिनी सांस्कृतिक स्पर्धेत आदर्श प्राथमिक विद्यालयाला तृतीय क्रमांक
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर २६ जानेवारी- प्रजासत्ताक दिनी क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आदर्श प्राथमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला असून या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक होऊन बक्षीस सुध्दा देण्यात आले.आदर्श प्राथमिक विद्यालयातील वर्ग चौथीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप २०२४ चा विषय घेऊन नृत्य नाटिका सादर केली. २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिके विरुध्द भारतीय संघाने १७ वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तो रोमहर्षक विजय कसा मिळाला याचे ज्वलंत सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. मान्यवरांसह प्रेक्षकांना हे सादरीकरण खूपच भावले. क्रीडा संकुलवर आयोजित संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर या सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमांचा निकाल जाहीर होऊन त्यामध्ये आदर्श प्राथमिक विद्यालयाला तृतीय क्रमांक मिळाला.याप्रसंगी व्यासपीठावरील आमदार चैनसुखसंचेती, हाजी रशीदखा जमादार, अशांतभाई वानखेडे, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे आदींच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श प्राथमिक विद्यालयाला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तत्पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.वर्ल्ड कप टी ट्वेंटी २०२४ या नृत्य नाटिकेच्या यशस्वीते करीता आदर्श प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय चव्हाण, शिक्षिका निकिता धाडे, विनोद इंगळे, विनोद रामेकर, सुजित राजपूत, विठ्ठल लांजूळकर आदींचे मार्गदर्शन लाभले
