
समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांचे आमरण उपोषणला यश,
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे
जळगाव जामोद समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफिस यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव जामोद यांना निवेदन दिला होता निवेदनात विविध मागण्या करण्यात आले होते जर आमच्या मागण्या कबूल ना झाल्यात उपोषणाच्या ही इशारा दिला होता परंतु नगर परिषदेने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि आमचे काम केले नाही, त्यानंतर दिनांक 25 1 2025 पासुन समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी जळगाव जामोद नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग चार आणि पाच, सुभेदार पुरा आणि सुलतानपुरा, काझीपुरा येथे अंगणवाड्या सुरू करण्यात यावी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी. सुलतान पुरा सुभेदार पुरा आणि काजीपुरा येथे नवीन पाण्याची पाईपलाईन टाकावी सुलतानपुरा आणि छोटी कबरस्थानच्या रस्त्यावरील हायमॉस लइटची व्यवस्था करावी. अशा विविध मागण्यांसाठी समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी उपोषण सुरू केले होते. सय्यद नफीसचे आमरण उपोषणाला राजकीय आणि सामाजिक लोकांसोबतच सर्व धर्माचे लोकही पाठिंबा दिल्याने,आज दिनांक 26/1/2025 रोजी मुख्याधिकारी साहेब जळगाव जामोद , यांनी उपोषण ठिकाणी उपोषण करते , समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांच्याशी चर्चा करून, व लेखी पत्र देऊन, विनंती केली, की आपुन केलेल्या मागण्या संपूर्ण पाठपुरावा करून , तात्काळ पूर्ण करण्यात येईल, मुख्याधिकारी जळगाव जामोद यांचे लेखी पत्र व विनंतीला मान देऊन जिल्हाध्यक्ष यांनी आपले उपोषण सोडले आहे
