
बुलडाणा तालुक्यातील मंजुर झालेली आरोग्य केंद्रे व उपकेंद्राच्या कामांना मान्यता देऊन कामे पूर्ण करावी – जालिंदर बुधवत.
अमिन शेख सहसंम्पादक
बुलडाणा,27/01/2025 रोजी जालिंदर बुधवत शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख बुलढाणा यांच्या वतीने जिल्हापरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरात यांना निवेदन सादर, कारण दोन वर्षापासून बुलडाणा तालुक्यातील मौजे पाडळी व मौजे जामठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांना निर्मितीची मान्यता मिळालेली असुन अद्यापही कामाला सर्वात झालेली नाही. जनुना, तराडखेड, कुंबेफळ, कुलमखेड येथे प्रा आरोग्य उपकेंद्र मंजुरीचे प्रस्ताव देऊन दोन वर्ष झाले असून वरील आरोग्य केंद्रे व उपकेंद्राच्या कामांना तात्काळ सुरुवात करण्यासाठी आज दिनांक २७/१/२५ रोजी श्री जालिंदर बुधवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख बुलडाणा यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरात यांना निवेदन दिले. यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर यांची उपस्थिती होती.
