
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी शिवसेना (उबाठा) तर्फे मलकापूर यथे फळ व शैक्षणिक साहित्याचे वाटप
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर दिनांक 23 जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उबाठा) तर्फे मलकापूर यथे फळ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मलकापूर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भा. रा. काँ. ज्येष्ठ नेते शामभाऊ राठी, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील, अनीलजी मुंदोकार, राजूभाऊ उखर्डे, राजूभाऊ काजळे, गणेश सुशीर, नासीर शेख, आसिम खान, जुबेर खान, रवींद्र टिकार, योगिता ताडे, भूषण कुलकर्णी, सौ. घोंगटे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
